शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

रोजगारक्षम विद्यार्थी घडवावेत!

By admin | Updated: January 11, 2016 01:11 IST

शिक्षण क्षेत्रात पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे योगदान मोलाचे आहे. सेवावृत्तीचा भाव ठेवून या संस्थेने आजवर कार्य केले.

पिंपरी : शिक्षण क्षेत्रात पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे योगदान मोलाचे आहे. सेवावृत्तीचा भाव ठेवून या संस्थेने आजवर कार्य केले. शिक्षण संस्थांनी ज्ञानदानाचे व्रत कायम ठेवून विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी न बनवता रोजगारक्षम बनविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांनी आकुर्डी येथे रविवारी केले. आकुर्डी-प्राधिकरण येथील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, शिवाजीराव आढळराव पाटील,अमर साबळे, ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, एआरसीटीचे चेअरमन डॉ. ए. डी. देशपांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, माजी खासदार नानासाहेब नवले, ट्रस्टचे सचिव विठ्ठल काळभोर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खजिनदार शांताराम गराडे, पद्मा भोसले, भाईजान काझी, माजी आमदार कृष्णराव भेगडे, आमदार गौतम चाबुकस्वार आदी उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले, ‘‘आपल्या देशात उच्च शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात सार्वत्रिकीकरण झाले आहे. पण गुणात्मक दर्जा उंचावण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी पदवीधर होतो, पण तो रोजगारक्षम नसतो. देशात सध्या बेरोजगारी ही समस्या राहिलेली नसून रोजगारक्षम तरुण मिळण्याची समस्या निर्माण झाली आहे. नोकरीसाठी आवश्यक असणारी कौशल्ये सध्याच्या तरुण पिढीकडे नसल्याची खंत उद्योगसमूहाकडून केली जाते.’’राज्यपाल म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी योजनेत पुण्याचा समावेश झाला आहे. सर्वाधिक वेगाने वाढणारे पिंपरी-चिंचवड शहर आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात आॅटो, फार्मास्युटिकल्स, मॅकेनिकल, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी आदी क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडची ओळख आशिया खंडात आहे. उद्योगक्षेत्राचा विकास साधायचा असेल, तर उद्योगांना कुशल कामगार अधिक उपलब्ध होण्याची गरज आहे.’’ शिक्षण क्षेत्राविषयी राज्यपाल म्हणाले, ‘‘शिक्षण संस्थांनी उद्योगांच्या सहकार्याने त्यांना कोणती कौशल्ये असणारे विद्यार्थी हवे आहेत, याचा अभ्यास करून त्या अनुषंगाने अभ्यासक्रम निश्चित करावेत. जेणेकरून विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढीस लागेल आणि उद्योगसमूहांनाही त्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ मिळेल. शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांनी उद्योजकता आणि नावीन्याचा ध्यास घेण्याची वृत्ती जोपासण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. नोकऱ्या मागणारे पदवीधर संस्थेतून बाहेर पडण्याऐवजी नोकऱ्या देणारे उद्योजक घडविण्यात शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा.’’‘‘शिस्तबद्धपणे शिक्षण देणारी ही संस्था आहे. भाऊंनी सहकार, राजकारण, समाजकारणाचे धडे दिले. त्यांच्या योगदानातूनच ही संस्था उभी राहिली आहे,’’असे आढळराव पाटील म्हणाले. हर्षवर्धन पाटील प्रास्ताविकात म्हणाले, ‘‘शंकरराव बाजीराव पाटील यांनी स्थापन केलेल्या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट अशा केजी ते पीजीपर्यंतचे शिक्षण ही संस्था देत चांगले व गुणवत्तात्मक शिक्षण देत आहे. भविष्यात अभिमत विद्यापीठासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.’’ रौप्यमहोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन झाले. अध्यक्ष लांडगे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. भाईजान काझी यांनी आभार मानले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)