अपंग विकास संघाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रंभा चॅरिटेबल ट्रस्ट व ओमकार फाउंडेशनतर्फे कोरोनाच्या काळामध्ये दिव्यांगांना मदत करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. पुरंदर तालुक्यातील गरजू दिव्यांग बांधवांना योग्य ती मदत पोहोचवली जाण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे ओमकार फाउंडेशनचे अध्यक्ष भाई ताम्हाणे यांनी सांगितले.
तालुक्यातील गरीब व गरजूंना अशाच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती रंभा चॅरिटेबल ट्रस्टचे सी. एस. आर मॅनेजर रणजित पुजारी यांनी दिली.
रंभा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दिलेली मदत व ओमकार फाउंडेशनच्या पदाधिकारी यांनी केलेले सहकार्य केव्हाही विसरता येणार नाही, असे अपंग विकास विकास संघाचे अध्यक्ष अमोल बनकर यांनी सांगितले. या वेळी अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्ती संस्थेचे मंदार कुळकर्णी, माजी जिल्हा परिषद सदस्य संगीता काळे, दिवेे ग्रामपंचायत सदस्य योगेश काळे, अपंग विकास संघाचे सासवड शहर अध्यक्ष काशिनाथ जगताप, कृष्णा काळे, शंकर क्षीरसागर, आमोल क्षीरसागर आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : पुरंदरमधील दिव्यांगांना मदत करण्यात आली.