शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

महापालिकेच्या औषध खरेदीचा बोजवारा

By admin | Updated: June 2, 2017 02:34 IST

रुग्णांसाठीची औषध खरेदी या महत्त्वाच्या विषयात स्थायी समितीने घातलेला घोळ असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : रुग्णांसाठीची औषध खरेदी या महत्त्वाच्या विषयात स्थायी समितीने घातलेला घोळ असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या जिवाशी खेळ करण्यासारखा आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सर्व नियम, कायदा पाळून पूर्ण झालेली निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा काढण्याच्या समितीच्या निर्णयामुळे गेले दोन महिने औषधांविना तळमळत असलेल्या किंवा कर्ज काढून त्यावर खर्च कराव्या लागणाऱ्या रुग्णांना आणखी किमान महिनाभर तरी तसेच राहावे लागणार आहे.माजी नगरसेवक राजन काची यांनी सांगितले, की अनेक माजी नगरसेवकांची आर्थिक स्थिती सध्या चांगली नाही. त्यांच्यावरील उपचारांच्या खर्चात प्रशासनाने अर्धी कपात केली आहे. सर्वसाधारण सभेने त्यांना १०० टक्के सवलत दिलेली असताना प्रशासनाने पदाधिकाऱ्यांबरोबर साधी चर्चाही न करता ही कपात केली. आता पदाधिकाऱ्यांनी थेट औषधांवरच संक्रात आणली आहे. इतक्या महत्त्वाच्या गोष्टीत प्रशासन व पदाधिकारी नियोजन करत नसतील, त्यांच्यात समन्वय नसेल तर त्यासारखे दुर्दैव नाही, असे मत काची यांनी व्यक्त केले.माजी महापौरांपासून अनेक माजी नगरसेवक महापालिकेच्या या विनामूल्य औषध योजनेचा लाभ घेत आहे. त्यांची नावे जाहीर करणे योग्य नाही; पण आपण स्वत: या योजनेतून औषधे घेत असतो, असे ते म्हणाले. याशिवाय शहरी गरीब योजनेतही अनेक गरीब गरजू रुग्णांना या योजनेचा लाभ मिळतो. कर्करोग, किडनी व अन्य काही आजारांवर बराच प्रदीर्घ काळ औषध घ्यावे लागतात. नियमितपणे खरेदी करून ही औषधे घेणे शक्य होत नाही. त्यामुळेच महापालिकेने ही योजना सुरू केली आहे. त्याचा पुरवठादार, त्यांच्याबद्दल संशय हा सगळा प्रशासन व पदाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे. त्यांनी तो वेळेवर सोडवणे गरजेचे आहे, त्यासाठी रुग्णांना वेठीस धरणे योग्य नाही. दरम्यान, औषध खरेदीची निविदा प्रक्रिया सर्व नियम, कायदे पाळून पूर्ण झालेली असतानाही ती रद्द करून फेरनिविदा काढण्याच्या स्थायी समितीच्या निर्णयाबाबतच आता शंका व्यक्त केल्या जात आहेत. सहा ठेकेदारांनी दाखल केलेल्या निविदांपैकी तीन निविदा पात्र ठरल्या व तीन अपात्र ठरल्या. काही औषधे पुरवण्यासाठी परवाना आवश्यक असतो. तशी अट निविदेत होती. एखादे औषध त्वरित लागले की ते पुरवता यायला हवे असते. त्यासाठी अनुभवाची अट असते. त्याशिवाय अन्य काही अटी असतात. त्याची पूर्तता होत नसल्याने तीन निविदा अपात्र ठरवून प्रशासनाने उर्वरित निविदांचा तक्ता स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. त्यांच्या मंजुरीनंतर किमान काही दिवसांनी औषधांचा पुरवठा होऊन दोन महिने तळमळणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळाला असता; मात्र पूर्ण झालेली निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा काढण्याचा अनाकलनीय निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. तसेच पूर्वीचे नियम व अटी शिथिल कराव्यात, असेही सुचवण्यात आले असल्याचे समजते.त्यामुळे आता पुन्हा किमान महिनाभर तरी ही औषध खरेदी लांबणार आहे. स्थायी समितीचा लेखी ठराव गाडीखाना या आरोग्य विभागाच्या मुख्यालयात अद्याप आलेला नाही. तो आल्यानंतर त्यांच्याकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. तसे करताना कोणत्या अटी व कोणते नियम शिथिल करायचे यावर खल होईल; कारण, काही विशिष्ट औषधांच्या पुरवठ्यासाठी लागणाऱ्या परवान्याच्या अटीत बदल करता येणे शक्य नाही. कमी मुदतीची निविदा काढावी असे सांगण्यात आले तरीही किमान सात दिवस लागतील. त्यानंतर आलेल्या निविदा खुल्या करण्याची पद्धत आहे. त्यात किमान आठ ते दहा दिवस जातील. त्यानंतर स्थायी समितीच्या मंजुरीसाठी आलेल्या निविदा ठेवल्या जातील. तिथे मंजुरी मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष औषध पुरवठ्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. तोपर्यंत रुग्णांनी करायचे काय, असा प्रश्न स्थायी समितीने या विषयावर घेतलेल्या भूमिकेने निर्माण झाला आहे.तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला औषधे मिळत नाहीत. फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेताना स्थायी समितीने तोपर्यंत जुन्या पुरवठादाराकडून औषधे घ्यावीत असे म्हटले आहे. हा फक्त शाब्दिक ठराव आहे. याची अंमलबजावणी होत नाही. रुग्णांच्या जिवाशी असा खेळ करणे अयोग्य आहे.- दत्ता एकबोटे, माजी महापौर.प्रशासन व पदाधिकाऱ्यांमध्ये कसलाही समन्वय नसल्याचे यातून सिद्ध होत आहे. त्यांना शंका आली व त्यांनी फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला याला काही अर्थ दिसत नाही. एकाच ठेकेदाराने कायम पुरवठा करू नये, दरवर्षी ठेकेदार बदलला जाईल, जुन्यांना काम दिले जाणार नाही, असा महापालिकेचा नियम नाही. त्यामुळे समितीने उपस्थित केल्या मुद्द्यात काही तथ्य नाही.- जयसिंग भोसले, माजी नगरसेवक, रविवार पेठ