मधुमेही रुग्णांमध्ये कोविडच्या वाढता धोका कमी रोगप्रतिकारशक्तीमुळे विषाणूचा गुणाकार मोठ्या संख्येने होतो. कोरोना विषाणू हिमोग्लोबिनवर हल्ला करत असल्यामुळे हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वहन क्षमता कमी होते. यामुळे अवयवांना योग्य पद्धतीने रक्त पुरवठा होत नाही. यामुळे सगळे अवयव निकामी होऊ लागतात. कोरोना रुग्णांच्या मृत्यूमागे सर्वात महत्त्वाचे कारण ठरले आहे ते आहे को-मोरबिडिटी. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे ज्या व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि किडनी यासारखे आजार आहेत. जगभरात सर्वात जास्त मृत्यू मधुमेहींमध्ये दिसले, याचाच अर्थ मधुमेहग्रस्त व्यक्तींना कोरोनाचा धोका अधिक आहे.
मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचे कारण काय? कमी प्रतिकारशक्तीमुळे विषाणूंचा गुणाकार मोठ्या संख्येने होतो. शरीरावर ताण पडल्यामुळे साखर वाढते. कोरोनाच्या उपचारात स्टेरॉइड्स वापरल्यामुळे रक्तातील साखर अनियंत्रित होते. कमी झालेली प्रतिकारशक्ती, वाढलेली साखर यामुळे शरीर योग्य साथ देत नाही. यामुळे विषाणूचा प्रादुर्भाव मृत्यूस कारणीभूत ठरतो. कोरोना आणि मधुमेह असणाऱ्या रुग्णांना म्युकरमायकोसिस या बुरशीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका अधिक असतो. या आजाराचे योग्य निदान व उपचार न झाल्यास जीव गमावण्याचा धोका निर्माण होतो.
कोरोना आणि जीवनशैली वर्क फ्रॉम होममुळे व्यायाम कमी झाला आहे. खूप वेळ बसून राहावे लागते, लाॅकडाऊन व्यायामाला जाता येत नाही. घरी बसून खूप खाल्ले जाते, त्यामुळे वजन वाढते.
डॉक्टरकडे जायचे टाळले जाते. यामुळे मधुमेह बळावतो. कोरोना विषाणूला आयतेच चांगले घर राहण्यास मिळते.
कोरोना संक्रमित झाल्यावर मधुमेही रुग्णाने काय करावे? कोरोना संक्रमित झाल्यावर अथवा तशी लक्षणे आढळल्यास अजिबात वेळ न घालवता आपली टेस्ट करून घ्यावी. त्यावर ताबडतोब उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने चालू करावेत. डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टींचे काटेकोर पालन करावे. सल्ल्याने औषधांचे सेवन करावे.
कोरोना झाला म्हणून मधुमेहींनी अजिबात घाबरू नये, योग्य वेळेत निदान व उपचार केल्यास कोरोनाला आळ घालता येतो.