शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
3
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
4
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
5
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
6
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
7
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
8
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
9
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
10
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
11
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
12
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
13
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
14
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
15
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
16
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
17
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
18
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
19
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
20
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी

उजनीतील मासेमारी व्यवसायाचा अस्तित्वासाठी संघर्ष

By admin | Updated: December 27, 2016 03:02 IST

उजनी धरणाने पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्याचा कायापालट केला. धरणामुळे कृषी, उद्योगक्षेत्राला भरभराटीचे दिवस आले तशीच भरभराट मासेमारी व्यवसायाला

कळस : उजनी धरणाने पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्याचा कायापालट केला. धरणामुळे कृषी, उद्योगक्षेत्राला भरभराटीचे दिवस आले तशीच भरभराट मासेमारी व्यवसायाला आली. मात्र मासेमारी व्यवसायातील ही प्रगती वाढण्याऐवजी उजनीतील हा व्यवसाय आज अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. २००८ पासून उजनी जलाशयात मत्स्यबीजच न सोडल्याने मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. १९८० ला धरणात पाणी अडवण्यास सुरवात केल्यानंतर मासेमारी व्यवसायालाही जोरात सुरुवात झाली. २००८ पर्यंत हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू होता. तेव्हा मासेमारीचे हक्क मत्स्य विभागाकडे होते. मात्र, २००८ मध्ये सुरक्षिततेच्या कारणावरून हे हक्क जलसंपदा विभागाकडे आल्यानंतर मासेमारी व्यवसायाला घरघर लागली. धरणातील मासेमारीवर व्यवसायावर पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांतील जवळपास ३० हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. सुरुवातीच्या काळात हमखास रोजगाराचे एक चांगले साधन म्हणून सुरू झालेल्या या व्यवसायामध्ये अलीकडच्या काळात अनेक अपप्रवृत्तीने शिरकाव केला आहे. मच्छीमारांकडून मासेमारीसाठी लहान जाळीचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे मत्स्यबीजाची शिकार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे माशांच्या पैदासीमध्येही मोठी घट झाली आहे. मत्स्यबीज न सोडल्याचा व परप्रांतीय मच्छीमारांनी केलेल्या बेकायदेशीर मासेमारीमुळे उजनीतील माशांचे उत्पादन पूर्णपणे घटून त्याचा गंभीर परिणाम यंदाच्या मासेमारी हंगामावर झाला आहे. धरण १०० टक्के भरूनही मच्छीमारांची मासेमारीसाठी सोडलेली जाळी रिकामीच निघत असल्याने मच्छीमारांच्या पदरी निराशाच आली आहे. भिगवण व इंदापूर मासळी बाजारात पूर्वी वीस टन माशांची आवक होत असते, परंतु गेल्या काही महिन्यांपासून ही आवक कमी झाली आहे. २००८ नंतर मत्स्यबीजच सोडले नाही. एका वर्षात धरणामध्ये सुमारे एक कोटी मत्स्यबीज सोडणे अपेक्षित आहे. मात्र, मासेमारीचे हक्क मत्स्य विभागाकडून जलसंपदा विभागाकडे आल्यानंतर धरणामध्ये एकदाही मत्स्यबीज सोडले नसल्याची धक्कादायक माहिती आहे. लहान जाळीतून होणारी मासेमारी, अनेक वर्षांपासून मत्स्यबीज न सोडल्याने आज धरणात मासे मिळणे मुश्कील झाले आहे. वास्तविक पाहता एका वर्षात धरणामध्ये सुमारे एक कोटी मत्स्यबीज सोडणे गरजेचे असून गत आठ वर्षांत आठ कोटी मत्स्यबीज सोडणे आवश्यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने केवळ नैसर्गिक पैदाशीवरच धरणातील मत्स्यसंपदा अवलंबून राहिली. त्यातही केवळ चिलापी या घाण पाण्यात वाढणाऱ्या माशाचे उजनीतील प्रमाण वाढल्याने त्याचाही फटका इतर जातीच्या माशांच्या उत्पादनास बसला आहे. उजनीत सुरुवातीला आढळणारे प्रामुख्याने वाम, मरळ, कटला, आहेर, बोदवा, शिंगी, मांगूर रोहू, शिंगटा, गुगळी, झिंगा, गवत्या असे विविध प्रकारचे चवदार मासे सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. उजनीतील चिलापीव्यतिरिक्त इतर माशांच्या जाती जवळपास कमी झाल्या आहेत.