सासवड : गेल्या दहा वर्षात सासवडची सत्ता मिळाल्यावर अनेक विकासकामे उभी केली. पाणी योजना, पालखी तळ, छत्नपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, शिवसृष्टी, सोपानदेव विकास आराखडा, अत्ने सांस्कृतिक भवन अशा वास्तू उभारलेल्या आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधींनी त्यांनी केलेले एक तरी काम दाखवावे, पुरंदरच्या विकास कामांवर खुल्या व्यासपीठावर येऊन जाहीर चर्चा करावी, असे खुले आव्हान पुरंदर-हवेलीचे युवा नेते संजय जगताप यांनी दिले.
सिंगापूर (ता. पुरंदर) येथे संजय जगताप यांच्या वैयक्तिक खर्चातून झालेल्या दीड लाख रुपयांच्या पेव्हिंग ब्लॉकच्या कामाचे उद्घाटन व युवक कॉंग्रेसच्या शाखेचे उद्घाटन संजय जगताप यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते म्हणाले, की लोकप्रतिनिधी काशी यात्ना, चार वाटप या कामांवर टीका करीत आहेत. त्यांना जनतेला या सुविधा देत येत नाहीत. आम्ही दिल्या तर त्यात चुकीचे काय झाले. तुम्हाला देता येत नसेल तर चुकीचे बोलू नका. पुरंदर उपसा योजना या भागासाठी नवसंजीवनी आहे. परंतु, त्याचा फायदा यांना जनतेला पुरेपूर घेऊ देता आला नाही. इतर उपसा योजनांपेक्षा चारपट पैसे भरूनही शेतक-यांना वेळेवर पाणी मिळत नाही यासाठीही त्यांना काही करता आले नाही असे जगताप यांनी सांगितले.
सिंगापुरचे सुपुत्न कै. शंकरराव उरसळ याच्यामुळे चंदुकाका जगताप यांनी संस्थात्मक कामाला सुरुवात केली व त्यात वाढ केली. तालुक्यातून या संस्था वजा केल्या तर काय राहील असेही जगताप म्हणाले. यावेळी पंचायत समिती सदस्य दत्तात्नय झुरंगे, विकास इंदलकर, माउली कोरडे, बाळासो ङिाझुरके, शरद दरेकर, प्रा. शशिकांत काकडे, अक्षय उरसळ, राजन लवांडे, सौरभ लवांडे, मुकेश कोरडे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रदीप पोमण, नंदकुमार जगताप, सचिन दुर्गाडे, गणोश मेमाणो, मंदार गिरमे, गणोश जगताप, विठ्ठल मोकाशी, अशोक बोरकर, प्रकाश पवार, राजू कड, विराज जगताप, भैय्या महाजन, तुषार ढुमे,आप्पा दिघे, छगन दिघे, दादा लवांडे, आबासो लवांडे, बाप्पू ङोंडे यांसह ग्रामस्थ, महिला व युवक उपस्थित होते. गणपत लवांडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
4याप्रसंगी शिवसेनेच्या पूर्व पुरंदरमधील महिला आघाडीच्या प्रमुख व वाघापूर ग्रामपंचायतीच्या सदस्या शमशाद मणियार व सिंगापूर येथील सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ते अशोकराव लवांडे यांनी संजय जगताप यांच्या हस्ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.