उरुळी कांचन : घराशेजारी बांधकामासाठी खोदलेल्या खड्डय़ात पडून सात वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उरुळी कांचन रेल्वे स्टेशनजवळ नव्याने रेल्वे क्वॉर्टरच्या बांधकामासाठी पायाच्या खोदलेल्या सुमारे 7 ते 8 फूट खोलीच्या खड्डय़ात पाणी साठले आहे. या पाण्यात पडून वैष्णवी दशरथ वाघमारे (वय 7 वर्षे) या पहिलीत शिकत असलेल्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 11 च्या सुमारास उघडकीस आली. ही मुलगी गुरुवारी सायं. 6 वाजल्यापासून सापडत नव्हती. तिच्या वडिलांनी तशी तक्रार पोलिसात दिली होती. सगळीकडे तपास करूनही तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. मात्र, आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तिचा मृतदेह घराशेजारी रेल्वेच्या क्वॉर्टर बांधण्यासाठी खोदलेल्या खड्डय़ातील पाण्यावर तरंगताना आढळला आणि परिसरावर दु:खाची छाया पसरली. वैष्णवीचे वडील दशरथ नागेंद्र वाघमारे (वय 32) हे आपले आई, वडील, 4 भाऊ, पत्नी, भावजय, 2 मुली व 1 मुलगा यांच्यासह रेल्वेस्टेशननजीक स्वत:च्या घरात गेल्या 1क् वर्षापासून राहतात ते व त्यांचे भाऊ फिरून भांडीविक्रीचा व्यवसाय करतात. वैष्णवी ही या घरात सर्वाची आवडती होती. (वार्ताहर)
4उरुळी कांचननजीक नायगाव येथे एका सिमेंट कंपनीचा मालधक्का नव्याने सुरू होत आहे. या कंपनीच्या वतीने रेल्वेच्या लेबर क्वॉर्टरला लागून आणखी काही लेबर क्वॉर्टर बांधून त्या रेल्वेकडे हस्तांतरित करणार आहेत. या बांधकामाचे काम करणा:या ठेकेदाराने पाया बांधकामासाठी खोदलेल्या खड्डय़ाभोवती कोणताही संरक्षक कठडा उभारला नाही. ठेकेदाराला शासन व्हावे, अशी मागणी तिच्या वडिलांनी केली आहे.