भोर : भोर तालुक्यातील १५५ ग्रामपंचायतींपैकी १०५ ग्रामपंचायती निर्मलग्राम झाल्या असून, राहिलेल्या ५० ग्रामपंचायतींपैकी २७ प्रस्ताव मंजूर झाले असून, शिल्लक राहिलेल्या २३पैकी ७ ग्रामपंचायती १०० टक्के झाल्या आहेत. त्यामुळे १६ ग्रामपंचायतींमधील २७६ शौचालये बांधणे बाकी आहेत. मात्र विभक्त झालेल्या कुटुंबांमुळे आॅनलाईनप्रमाणे ४४२१ शौचालये बांधायची राहिली आहेत. त्यासाठीचे संपूर्ण नियोजन झाले असून, २ आॅक्टोबरला भोर तालुका निर्मलग्राम म्हणून जाहीर करणार असल्याचे गटविकास अधिकारी संजीव गायकवाड यांनी सांगितले.भोर तालुक्यातील १९५ गावांतील एकूण ३१३९५ कुटुंबांपैकी २६९७४ कुटुंबांकडे शौचालये असून, ४४२१ लोकांकडे शौचालये नाहीत. सदरच्या शौचालयाच्या बांधकामासाठी सुमारे ३६ लाखांची मागणी केली आहे. शौचालये बांधकाम करण्यासाठी गावागावात जाऊन प्रबोधन सुरू असून, लोकांची मानसिकता बदलण्याचे काम सुरूआहे. यासाठी भोर पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सर्व विभागप्रमुख, विस्तार अधिकारी व सर्व विभागांचे कर्मचारी एकत्रित काम करत आहेत.प्रत्येक गावाला एक अधिकारी नेमून योग्य समाजप्रबोधन करून शौचालये बांधण्यासाठी नागरिकांची मने वळविण्यात येत असून, सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. अत्यंत प्रभावीपणे काम सुरूअसून येत्या २ आॅक्टोबरला भोर तालुका निर्मलग्राम म्हणून जाहीर करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. (वार्ताहर)
भोर तालुका होणार निर्मलग्राम
By admin | Updated: September 4, 2015 02:00 IST