महिनाभरापासून पाऊस नसल्याने भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यातील 8क् टक्के भाताचे तरवे करपले आहेत. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. पाणीसाठेही संपल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या तिन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
भोर : तालुक्याच्या पश्चिम भागातील हिडरेशी, वेळवंड, महुडे, भूतोंडे या खो:यांत धूळवाफेवर भाताची पेरणी केली. त्यानंतर झालेल्या एका पावसावर उगवण झाली. मात्र, महिनाभर पावसाने दडी मारल्याने रोपे करपली आहेत. त्यामुळे वीसगाव खो:यात पेरलेल्या भात व भुईमूग, उडीद, घेवडा या कडधान्यांची उगवणच झाली नाही. त्यामळे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. पुन्हा पेरणी करायला बियाणोही उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आल्याचे बाजारवाडी येथील शेतकरी माऊली शिंदे यांनी संगितले.
याउलट, पूर्व भागात पाऊस झाल्यावर जमिनीला वाफसा आल्यावर भातासह खरिपाची पेरणी करतात. मात्र, पावसाने दडी मारल्याने पेरण्याच रखडल्या आहेत. तालुक्यातील दोन्ही भागांत वेगवेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
वेल्हे : भाताचे आगार समजल्या जाणा:या वेल्हे तालुक्यातही पावसाअभावी भातरोपे वाळून जाऊ लागली आहेत. वेल्ह्याच्या पश्चिम भाग, अठरागाव मावळ भागात धूळवाफेवर भाताच्या बियाणांची पेरणी केली, तर पूर्व भागात थोडासा पाऊस पडल्यानंतर पेरणी केली गेली.
तालुक्यात सुमारे सहा हजार हेक्टरवर भात लागवड केली जाते. यंदा 5 हजार 57 हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन केले होते. मात्र पावसाने ते कोलमडले आहे.
अठरागाव परिसर व इतर सर्व भागांत भातरोपे चांगली आली होती. परंतु जून महिना संपला तरी पाऊस न पडल्याने आता मात्न भातरोपे वाळून गेली. याचा उत्पादनावर मोठा परिणाम होऊन उत्पन्नात घट होत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
तालुक्यातील गुंजवणी धरणातील पाणीसाठा संपत आल्याने नदीला पाणी नाही. पाण्यावरील पिकेसुद्धा अडचणीत आली आहेत. शेतक:यांवर दुबार पेरणी, कमी उत्पन्न, बियाणांसाठी मशागतीसाठी केलेला खर्च वाया जाणार असून, उपासमारीची वेळ वेल्ह्यातील शेतक:यांवर येणार आहे.
पाईट : पावसाअभावी खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भात रोपे जळू लागली असून, तालुक्यातील भातपीक संकटात येणार असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील खरीप हंगाम पूर्णपणो वाया जाण्याच्या स्थितीत आहे. रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्र कोरड गेले असून, आद्र्रा नक्षत्रतील पहिले दोन दिवस पावसाचा कोठेच मागमूस नाही.
प्रथम धुळवाफेवर केलेल्या भातरोपवाटिका व भातपेरण्या पूर्णपणो जळून गेल्या असूनस दोन दिवसांपूर्वी झालेल्या तुरळक पावसाने काही प्रमाणत न उगविलेल्या भातरोपवाटिका उगविल्या; परंतु त्याही जळून जात असल्याचे चित्र पश्चिम भागातील पाईट, सुपे, सातकरवाडी, पाळू, आबोली, आडगाव, वाघू, परसूल, विराम, भलवडी, वांद्रे, तेकवडी, आनावळे, कुडे, घोटवडी, पराळे, आहिरे, तोरणो, कोये, धामणो, तळवडे या भागात आहे. त्यातच मुंबईमध्ये पडलेल्या पावसाच्या आधारावर वाद्रें भलवदी विराम आंबोली परिसरातील काही गावांतील जवळपास 9क् टक्के शेतक:यांनी जळालेल्या भातरोपवाटिका मोडून पुन्हा नव्याने भातरोपवाटिका टाकल्या आहेत. परंतु, मुंबईतील पावसाचा जोर कमी झाल्याने या गावातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
पौड : भाताचे आगार व पावसाची हमखास खात्री असलेल्या मुळशी तालुक्यालाही पावसाने यंदा हुलकावणी दिली आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकरी अन्य ठिकाणांहून टँकरने पाणी आणून भातरोपे जगविण्यासाठी प्रय} करीत आहेत.
जूनच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या थोडय़ाफार पावसावर व मुळा नदीच्या पाण्यावर भरोसा ठेवून आसदे, भादस, खुबवली, रावडे, पौड, दारवली, अंबडवेट, घोटावडे, भरे, मुलखेड, लवळे यांसह नदीकाठच्या अन्य गावांतील शेतक:यांनी भातरोपांची पेरणी केली होती. पेरणी केलेली रोपे विरळ का होईना उगवली; परंतु तब्बल महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसामुळे मात्र ब:याच ठिकाणची रोपे जळून गेली आहेत. उरलेली रोपे जगविण्यासाठी शेतकरी धडपडताना दिसत आहेत.
मुळशी धरणाची पातळी खालावल्याने टाटा कंपनीने मुळा नदीत पाणी सोडणो बंद केले आहे. त्यामुळे आता पाऊस लवकर पडत नसल्याने शिल्लक रोपेही डोळ्यांदेखत जळत असल्याने शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत.
4तालुक्यात 7,4क्क् हेक्टरवर भाताची लागवड होते. गेल्या वेळी 1क्क् टक्के लागवड पूर्ण झाली होती. या वेळी तरवेच नसल्याने लागवड क धी व किती होणार, हे सांगता येत नाही. भाताच्या रोपांप्रमाणो भुईमूग, तूर, मूग, घेवडा, उडीद यांचीही आवस्था वाईट आहे. मागील 4क् वर्षात अशा प्रकारचा दुष्काळ पडला नाही, इतकी भयानक अवस्था झाली आहे.
8क् टक्के पीक वाया जाणार
4तालुक्याचा पश्चिम भाग भाताचे आगर समजले जाते. एकूण 7,4क्क् हेक्टरपैकी या भागात 7क् टक्के भाताची लागवड होते. भात हे मुख्य पीक असून, भाताच्या उत्पादनावरच येथील लोकांचे जीवन आहे. एकच पीक काढले जाते. पाऊस झाला तर शेती, अशी स्थिती आहे. यंदा भाताचे 8क् टक्के पीक जाणार. यामुळे तांदूळ विकत घेण्याची वेळ येथील शेतक:यांवर येईल. त्यामुळे भोर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे.
वेल्हे तालुक्यात पूर्व भागात 25 ते 30 टक्के भघताची रोपे करपली आहेत. अजून काही दिवस पाउस झाला नाही तर हे प्रमाण 5् टक्क्यांर्पयत जावू शकते. पश्चिम पट्टयात या पेक्षा बरी स्थिती आहे. कृषी विभागातर्फे जेथे पाणी उपलब्ध आहे तेथे सामुदायिक रोपवाटिका तयार करण्याचा आमचा मानस आहे.
- संजय पिंगट
तालुका कृषी अधिकारी, वेल्हे