शिवे, रौंधळवाडी, चोरघेवाडी, वाघू, साबळेवाडी, गवारवाडी, कासारी, कुदळेवाडी या गावांना नागरी सुविधा देण्यात याव्यात. पाणी परवाने, तसेच धरणग्रस्तांना महापालिकेत नोकरी द्यावी. या गावांचा आहे विरोध■ खेड तालुक्यातील वाकी तर्फे वाडा, पराळे, रौंदळवाडी, अहिवळे, पाईट, शिवे, कासारी, वाघुची, साबळेवाडी, तोरणे, वाफगाव या गावांचा विरोध आहे. वाकी तर्फे वाडा, पराळे, रौंदळवाडी, अनावळे ही गावे पूर्णत: तर पाइट, शिवे, कासारी, वाघुची, साबळेवाडी, तोरणे, वाफगाव ही अंशत: बाधित आहेत. शेतकर्यांची जमीन घेऊन पुनवर्सनाचे आश्वासन न पाळल्याने या गावांत शासनाविरूद्ध रोष आहे. पिंपरी : आधी पुनवर्सन करा, नंतर प्रकल्प राबवा अशी भूमिका खेडमधील शेतकर्यांनी घेऊन बंदिस्त जलवाहिनीचे काम बंद पाडले आहे. पवना बंदिस्त जलवाहिनीस तीव्र विरोध झाल्यानंतर भामा आसखेडमधून पाणी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकर्यांच्या विरोधामुळे भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्प अडचणीत आला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसाठीच्या जलवाहिनीचे काय होणार, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.पिंपरी-चिंचवड शहरास सध्या पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. धरणातून हे पाणी रावेतपर्यंत आल्यानंतर महापालिकेच्या वतीने जलउपसा केंद्रातून सध्या प्रतिदिन ४५५ दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते, तर जलशुद्धिकरणाची क्षमता ५१५ दशलक्ष लिटर आहे. ८५ टाक्यांच्या माध्यमातून जलवाहिन्यांद्वारे १ लाख ३८ हजार ४५८ नळजोडांतून पुरवठा केला जातो. शहराची २0४१ मधील ३३ लाख ६८ हजार ५00 ही लोकसंख्या विचारात घेता प्रतिदिन आणखी ४६९ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा आवश्यक आहे. त्यामुळे जवाहलाल नेहरू नागरी पुनरूत्थान (जेएनएनयूआरएम) अंतर्गत सुरूवातीला पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव २00९ मध्ये मंजूर करण्यात आला. त्यानुसार कामही सुरू झाले. मात्र, शेतकर्यांनी कडवा विरोध केल्याने या कामास स्थगिती दिली आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून जिल्हा प्रशासन, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्याची योजना तयार केली. पिंपरी-चिंचवड शहरासाठी त्यानुसार भामा आसखेड आणि आंध्रा धरणातून प्रतिदिन ३७८ दशलक्ष लिटर उचलण्याचे नियोजन आहे. त्यांपैकी आंध्रा धरणातून १00 आणि भामा आसखेड धरणातून २00 दशलक्ष लिटर पाणी उचलले जाणार आहे. त्यासाठीचे सर्वेक्षण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरूवातही झाली आहे. संबंधित काम शेतकर्यांनी अडविले आहे. त्यामुळे शहरासाठी महत्त्वाच्या असणार्या भामा-आसखेड ते पिंपरी या जलवाहिनी प्रकल्पाचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(प्रतिनिधी) ■ मावळप्रमाणे खेडमध्येही आता पाण्याचे राजकारण सुरू झाले आहे. जलवाहिनीचे काम सुरू झाल्याने गावांमधून विरोध व्हायला सुरूवात झाली आहे. त्यात गावपुढारी अग्रभागी आहेत. त्यांच्याकडून पाण्याचे राजकारण होत आहे, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे. ज्या गावांना या योजनेची झळ पोहोचणार आहे. त्या गावांतील शेतकरीही आक्रमक होण्याच्या मार्गावर आहेत. प्रश्न चिघळण्यापूर्वी तो सामोपचाराने सोडवावा, अशी शेतकर्यांची मागणी आहे.
भामा-आसखेड'ही अडचणीत
By admin | Updated: July 7, 2014 05:48 IST