शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

'...कारण आता माझं वय देखील ८४ झालं आहे", शरद पवार यांनी व्यक्त केले मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 19:50 IST

'वय झालं म्हणून थकायचं नाही, वय झालं म्हणून विचार सोडायचा नाही. आपण चालत राहू एवढीच खूणगाठ बांधा'

बारामती - 'आता ज्येष्ठांच्या ओळीत मी पण बसतो, कारण आता माझं वय ८४  झालं आहे. जेष्ठ नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजेत. ज्येष्ठ नागरिकांचा मोठा वर्ग असून देशाच्या उभारणीत यांचा मोठा वाटा आहे. नव्या पिढीला ज्ञान देणारे घटक म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते’, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, ज्येष्ठ नेते  शरद पवार यांनी व्यक्त केले . रविवारी (दि. १०)सायंकाळी ते बारामती येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या अनौपचारिक कार्यकमात बोलत होते. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरीकांसमवेत संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

पवार पुढे म्हणाले, वय वाढले हे ठीक आहे, परंतू वय वाढलं आणि आपण जेष्ठत्वाकडे झुकलो तरी कदाचित आपले पाय दुखतील, गुडघे दुखतील, दात दुखतील, पण त्याचा आपल्या डोक्यावर परिणाम होत नाही, म्हणजेच मेंदूवर परिणाम होत नाही. हा मेंदू जोपर्यंत सशक्त आहे, तोपर्यंत आपल्याला या वय वाढण्याचे, चिंता करण्याचे कारण नाही. जेष्ठ नागरिक हे समाजाचा ठेवा आहेत. तो ठेवा असाच जपण्याची गरज आहे, असं मत पवार यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, आपल्याकडे आधी कापसाच्या जिनिंग मिल होत्या, तसंच अनेक गुऱ्हाळे होती. त्यानंतर जाचक, घोलप माझे वडील असतील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर सोमेश्वर कारखाना मुकुटराव काकडे यांनी स्थापन केला, त्यानंतर माळेगाव कारखाना सुरू झाला आणि या दरम्यानच्या काळामध्ये येथील गुऱ्हाळे गेली आणि कारखानदारी वाढीस लागली आणि इथून सगळे परिस्थिती बदलण्यास सुरवात झाल्याचे पवार म्हणाले.

सुरुवातीला फक्त एम.ई.एस संस्थेची शाखा होती. त्यानंतरच्या काळामध्ये विद्या प्रतिष्ठान शारदानगरचे कृषी विकास प्रतिष्ठान त्यानंतर माळेगावचं इंजिनिअरिंग कॉलेज, सोमेश्वरचे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झाले आणि शिक्षणाने परिस्थिती बदलली. पुण्यानंतर ज्ञानाचे केंद्र बारामती हे झाले. त्यानंतर आपण येथे एमआयडीसी सुरू केली. प्रक्रिया करणारे उद्योग या ठिकाणी सुरू झाल्याची आठवण पवार यांनी सांगितली.

तो काळ असा होता की समोर कोणीही आले तर त्याचे नाव माहिती असायचे, आता  टक्के लोक ओळखू येत नाहीत. कारण अनेक लोक इथे बाहेरून आले त्यांनी बारामतीला आपले मानले आणि बारामतीचा लौकिक वाढवला. तिथे स्थायिक झाले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बारामतीचे योगदान मोठे आहे. माझा जन्म झाला तेव्हा स्वातंत्र्यलढा सुरू होता, त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात माझे योगदान नाही, मात्र स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेली खूप मोठी माणसे या ठिकाणी असल्याचे पवार म्हणाले. मोरोपंतांनी विपुल लेखन केलं, केकावली लिहिली. श्रीधर स्वामींनी इथल्याच कसब्यातल्या मंदिरात शिवलीलामृत ग्रंथ लिहिला, बारामतीचे योगदान खूप मोठं आहे. हे मोठं योगदान आपण नव्या पिढीला शिकवलं पाहिजे’, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

....वय झालं म्हणून थकायचं नाही

बारामतीनगरी राज्यामध्ये आणि देशामध्ये आदर्श नगरी म्हणून मान्यता पावली आहे. तुम्हा लोकांच्या कष्टामुळे हा तालुका नावारूपाला आला आहे. मी आपणा सर्वांचा ऋणी आहे. वय वाढलं की त्याचा परिणाम गुडघ्यांवर होईल,पायांवर होईल पण डोक्यावर होणार नाही. त्यामुळे वय झालं म्हणून थकायचं नाही, वय झालं म्हणून विचार सोडायचा नाही. आपण चालत राहू एवढीच खूणगाठ बांधा ,असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.  

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीlok sabhaलोकसभाPoliticsराजकारण