शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बारामती, इंदापूरचे दूध उत्पादक अडचणीत

By admin | Updated: November 22, 2014 00:39 IST

एफआरपीप्रमाणे ऊस उत्पादकांना ऊस दर न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करण्याचे संकेत राज्य शासनाने दिले आहेत.

शेटफळगढे : एफआरपीप्रमाणे ऊस उत्पादकांना ऊस दर न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करण्याचे संकेत राज्य शासनाने दिले आहेत. त्याचप्रमाणे दूध उत्पादकांना आधारभूत किमतीपेक्षा कमी दर देणाऱ्या दूध संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणी दूध उत्पादकांकडून केली जात आहे.एका महिन्यात २४ रुपयांवरून १९ रुपयांवर प्रतिलिटर दूध खरेदी दर केला. शासनाचा दूध दर मात्र २० रुपये असताना खासगी दूध व्यावसायिक दूध उत्पादकांना १९ रुपयाने दर देण्याचा घाट घालत आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा ही कमी दर देत आहेत. तरी देखील शासन स्तरावरून कोणतीच हालचाल होत नाही. परिणामी दूध धंदा करणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दूध व्यावसायिक शेतकऱ्यांना पावडरीचे दर कोसळले आहेत. त्यामुळे २४ रुपयांचा खरेदी दर १९ रुपयांवर आणला आहे, असे उत्पादकांना सांगितले. मात्र, बाजारातील दूध ग्राहकांना मात्र पूर्वीच्याच दराने दूध विकले जात आहे, असे धोरण राबवून दूध उत्पादकांची लूट होत असल्याची भावना दूध उत्पादकांची होत आहे. दूध व्यवसायातील जाणकार लोकांच्या मते दुधाची केवळ पावडरच बनत नाही, तर इतर उत्पादने केली जातात. त्या इतर उत्पादनाचे भाव मात्र ‘जैसे थे’ आहेत. पावडर की इतर उत्पादने तयार करून राहिलेल्या दुधापासून बनविली जाते. त्यामुळे पावडरच्या बाजारावर शेतकऱ्यांचा दर कमी करणे चुकीचे आहे, असे सांगत आहेत. बाजारात पावडरीचे दर १५० च्या दरम्यान आहेत. मात्र, ते दर २८० रुपयांवर असताना शेतकऱ्यांना अधिकचा दर दिला नाही, असा सवाल देखील दूध उत्पादकांमधून होत आहे. (वार्ताहर)