पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील रिसे, पिसे, राजुरी, नायगाव, पांडेश्वर व बारामतीमधील भोंडवेवडी, चांदगुडेवाडी, आंबीमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळास स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असून हे विमानतळ स्थानिकांना नको आहे.
यासाठी पुरंदर विमानतळविरोधी संघर्ष समितीने पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांची भेट घेऊन विमानतळ नको असल्याचे सांगत सविस्तर चर्चा केली व निवेदन दिले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरंदर तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, विमानतळविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश मुळीक, राजुरीचे सरपंच उध्दव भगत, नायगावचे सरपंच हरिदास खेसे, अंकुश भगत, शैलेश रोमन, भरत बोरकर, पोपट खैरे, किरण साळुंके, शशिभाऊ गायकवाड, संतोष कोलते, प्रदीप खेसे, विश्वास आंबोले, सदाशिव चौंडकर, महेंद्र खेसे, चंद्रकांत चौंडकर, महेश कड आदी उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : १३ भुलेश्वर महाविकास आघाडी
फोटो ओळ : आमदार संजय जगताप यांच्याशी चर्चा करताना विमानतळविरोधी संघर्ष समितीचे सदस्य व इतर.