मात्र खेडशिवापूर दूरक्षेत्र हद्दीतील हॉटेल व्यवसायिक ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश देऊन ग्राहकांना हॉटेलमध्ये बसून खाद्यपदार्थाचे विक्री करत असल्याची निदर्शनास आल्याने त्यानुसार हॉटेल पुणेरी, हॉटेल जय भवानी, पलंगे बिर्याणी, बार्बेक्यू मिसळ हाऊस, हॉटेल कैलास, हॉटेल चुल मटण, हॉटेल सुर्वेज, घोलप बिर्याणी, चेलाडी फाटा येथील हॉटेल न्यू पिंगारा, कापूरहोळ चौक येथील हॉटेल आनंद, हॉटेल बालाजी अशा ११ हॉटेलवर जिल्हाधिकारी पुणे यांचे आदेशाचे उल्लंघन केले म्हणून करू न १८ हजार ५०० रुपयांची दंडात्मकर कारवाई करण्यातआली. तसेच वीनामास्क फिरणाऱ्या ८२ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून, ४१ हजार रूपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.
ही कारवाई संदीप घोरपडे पोलीस निरीक्षक, राजगड पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली मनोजकुमार नवसरे, सहा पोलीस निरीक्षक निखील मगदुम पोलीस उपनिरीक्षक, हुल साबळे, पोलीस उपनिरिक्षक, भगीरथ घुले, पोलीस हवालदार, अजित माने, पोलीस हवालदार, कुंडलिक माने, पोलीस हवालदार, संतोष तोडकर पोलीस हवालदार, सोमनाथ जाधव पोलीस शिपाई यांनी केली आहे.