शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

बेल्ह्यात राज्यस्तरीय परिषदेत ८५० विद्यार्थी सहभागी

By admin | Updated: January 12, 2017 02:13 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व समर्थ ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, बेल्हा (ता. जुन्नर) यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ

बेल्हा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व समर्थ ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, बेल्हा (ता. जुन्नर) यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकतेच एकदिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या काळात ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ याकडे असलेला विद्यार्थ्यांचा कल या विषयावर ही परिषद आयोजित केली होती.या परिषदेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष व शैक्षणिक परिषदेचे सदस्य डॉ. सुनील कुटे आणि आळेफाटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, समर्थ अभियांत्रिकी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अण्णासाहेब गोजे, डॉ. दीपराज देशमुख, एमबीएचे प्राचार्य डॉ. सुभाष जाधव, प्रा. राजीव सावंत, प्रा. अर्जुन औटी, प्रदीप गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.या परिषदेत संशोधन पेपर सादरीकरणासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, सोलापूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी आदी वेगवेगळ्या विद्यापीठांतून २०७ संशोधन पेपर आणि जवळपास ८५० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कल्पकतेला वाव मिळावा, या हेतूने नवनवीन कल्पना-तंत्रज्ञानाची जोड देऊन समाजाभिमुख केलेल्या नवीन कलाकृती आणि यासारख्या विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित संकल्पनेचा आविष्कार या परिषदेत दिसून आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. सुनील कुटे म्हणाले, ‘‘मनात आलेली भन्नाट कल्पना सूत्रबद्धरीत्या तांत्रिक बाबींची पूर्तता करून पेपरच्या माध्यमातून इतरांसमोर मांडण्याचे कौशल्य आत्मसात करा.’’ या परिषदेतील सहभागी संशोधन पेपरचे निकाल खालीलप्रमाणे :इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग : प्रथम क्रमांक- आरोटे तेजस्विनी, काळे धनवंतरी आणि रेश्मा नलावडे यांना विभागून देण्यात आले. द्वितीय क्रमांक- सरिता जाधव, मेहेर सायली, अश्विनी बुट्टे आणि भोर शीतल, मरगळ शुभांगी यांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक- अश्विनी भोर, भावना घोलप, मेहेर मीनल आणि आहेर सुषमा, आंधळे अश्विनी यांना विभागून देण्यात आला.सिव्हिल विभाग : प्रथम क्रमांक- विनायक कांदळकर, ए. एस. बाबर, ए. डी. थोरवे, पी. पी. बांदल, जी. आर. माने, ए. सी. धोत्रे, एस. ए. सणस यांना विभागून देण्यात आला. द्वितीय क्रमांक- एस. बोडके, एस. बोरचटे, विकास घुले, संजय राजगुरू, ए. वि. राक्षे, टी. एस. औटी यांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक- तुषार नवले, फिरोज सय्यद यांना विभागून देण्यात आला. मेकॅनिकल विभाग : प्रथम क्रमांक- रिषभ प्रवीण बफणा, मनोज दातार, वृषभ डेंगळे, योगेश आरोटे, फाटांगरे सचिन यांना विभागातून देण्यात आला. द्वितीय क्रमांक- शुभम भोर,अनघा दुराफे,अक्षय काळे,अश्विनी थोरात, मयूर यंगडाल यांना विभागातून देण्यात आला. तृतीय क्रमांक- अनिकेत आंद्रे, रेश्मा आवटे, आलिशा महाले, दिव्या पिंगळे, मनोज निकम विकास इसामे यांना विभागून देण्यात आला.कॉम्पुटर विभाग : प्रथम क्रमांक- अंजुम इनामदार, कार्तिकी वहतोळे, विशाखा शिंदे, हर्षदा तोहाके, करिश्मा अजब, अश्विनी जाधव यांना विभागून देण्यात आला. द्वितीय क्रमांक- अमृता थिटे, गणेश थोरात, पायल हांडे, श्रद्वा शाह यांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक- आरती वाकचौरे, अश्विनी भोर, स्वप्निल बाह्मणे, सायली औटी, प्रतीक्षा जाधव, मेघना गाडगे यांना विभागून देण्यात आला. (वार्ताहर)