लोणी काळभोर : वडकी (ता. हवेली) येथे अज्ञात चोरटय़ांनी भरदिवसा घरफोडी करून साडेपंचवीस तोळे सोन्याच्या, 27क् ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह 3 लाख 15 हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण 8 लाख 86 हजार रुपये किमतीचा ऐवज भरदिवसा चोरून नेल्याची घटना 26 जून रोजी दुपारी उघडकीस आली.
पोलीस निरीक्षक अभिमान पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ कैलास मोडक (रा. वडकी 1क्वा मैल) हे स्वत:च्या दुमजली इमारतीत दुस-:या मजल्यावर राहतात. दीडच्या सुमारास गोकुळ मोडक हे घरी परतले. ते घरापाशी आले असता त्यांना दरवाजाचे कुलूप उघडे दिसले. त्यांना आतील चारही खोल्यांमधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. गोकुळ मोडक यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये 3 लाख 96 हजार रुपये किमतीचे 11 तोळे वजनाचे गंठण, 88 हजार रुपये किमतीची एकूण 4 तोळे वजनाची चार लहान गंठणो, 33 हजार रुपये किमतीचे दीड तोळा वजनाचे कानातील टॉप्सचे दोन जोड, 22 हजार रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे वेल, 11 हजार रुपये किमतीची अर्धा तोळा वजनाची अंगठी, 11 हजार रुपये किमतीचे अर्धा तोळा वजनाचे कानातील डूल, असे साडेपंचवीस तोळे सोन्याचे दागिने, व रोख रक्कम असा एकूण 8 लाख 86 हजार रुपयांचा ऐवज चोरला.
4हॉलमधील फर्निचरच्या ड्रॉवरचे कुलूप तोडलेले, बेडरूममधील कपाटातील ड्रॉवरचे कुलूप तोडून त्यातील दागिने, त्या कपाटाशेजारी असलेल्या लाकडी शोकेसचे कुलूप उचकटून त्यात ठेवलेली 2 लाख 65 हजारांची रोख रक्कम याबरोबर कपाटात ठेवलेले बँकेचे पासबुक व फिक्स डिपॉझीटच्या पावत्या आणी भाऊ अविनाश यांच्या बेडरूममधील कपाट उघडून त्यात ठेवलेले दागिने व रोख रक्कम 5क् हजार चोरून नेल्याचे निदर्शनास आले .