डिंगोरे गावात १५ नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे तेथील बाधितांची संख्या २३९ झाली आहे. १९८ बरे झाले आहेत, ३४ जणांवर उपचार सुरू आहेत. ओतूर शहरातील बाधितांची संख्या ९३५ झाली आहे. ८४८ बरे झाले आहेत, तर ५१ जणावर उपचार सुरू आहेत. ३६ जणाचा मृत्यू झाला आहे. नेतवड माळवाडी येथील बाधितांची संख्या ७८ झाली आहे. ५६ जण बरे झाले आहेत २० जण उपचार घेत आहेत. २ जणांचा मृत्यू झाला आहे. हिवरे खूर्द येथील ५५ पैकी ४९ बरे झाले आहेत. दोन जण उपचार घेत आहेत. ४ जणांचा मृत्यू झाला आहे. खामुंडी ९९ पैकी ८८ बरे झाले आहेत. ५ जण उपचार घेत आहेत. ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तेजेवाडी ६१ पैकी ५७ बरे ३ जण उपचार घेत आहेत. रोहोकडी येथील ६३ पैकी ५९ बरे आहेत. एकावर उपचार सुरू आहे तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
ओतूर परिसरात गुरुवारी ३३ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:12 IST