शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पदवीपेक्षा कौशल्यविकासाला तरुणांनी दिले महत्त्व

By admin | Updated: September 7, 2015 04:26 IST

महाविद्यालयात प्रवेश घेतला, अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवी प्रमाणपत्र मिळाले, त्यानंतर कोठे तरी नोकरी मिळवायची, एवढाच उद्देश न ठेवता शिक्षण घेतो

संजय माने, पिंपरीमहाविद्यालयात प्रवेश घेतला, अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवी प्रमाणपत्र मिळाले, त्यानंतर कोठे तरी नोकरी मिळवायची, एवढाच उद्देश न ठेवता शिक्षण घेतो, ते परिपूर्ण कौशल्याचे असावे, असे ध्येय निश्चित करून कौशल्य पणाला लावलेल्या पिंपरी-चिंचवडमधील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांनी स्पर्धेसाठी मोटार तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सलग दोन वर्षे यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा हा यंदाचा तिसरा प्रकल्प आहे. सोसायटी आॅफ आॅटोमोटिव्ह इंजिनिअर्स (एसएइ) या संस्थेच्या पुढाकाराने दर वर्षी इंदोर येथील पितांपूरमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्यात येते. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारे विद्यार्थी देशभरातून या स्पर्धेत सहभागी होतात. त्यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण करतात. सुमारे ४०० प्रकल्पांतून १२० प्रकल्पांची निवड केली जाते. त्यात सलग दोन वर्षे निवड झालेल्या आणि यशस्वी कामगिरी केलेल्या हिंजवडीतील अलार्ड इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या वर्षी स्पर्धेत उतरण्याची जय्यत तयारी केली आहे. चुरस, स्पर्धा, यश, पारितोषिक हे टप्पे महत्त्वाचे मानले गेले, तरी त्या पलीकेडे ज्ञान मिळवितो, ते कौशल्यपूर्ण असावे, हा उद्देश बाळगलेले विद्यार्थी अभ्यासाबरोबर कौशल्यगुण विकासाला अधिक महत्त्व देत आहेत. काळेवाडीतील एका सोसायटीत त्यांचे मोटार जोडणीचे काम सुरू आहे. काळेवाडीतील एका गृहसंस्थेत यातील काही विद्यार्थी सदनिका भाड्याने घेऊन राहतात. त्या ठिकाणी ते प्रकल्पाचे काम करीत आहेत. वर्क्सशॉपमध्ये जाऊन वेल्डिंग, ग्राइंडिंगची कामे करून घेतली जातात. मोटारीचे आवश्यक ते सर्व सुटे भाग हे विद्यार्थी स्वत:च तयार करतात. २३ जणांचा गट या प्रकल्पासाठी राबतो आहे. प्रकल्पाचा उपकप्तान असलेला प्रदीप अकोलकर म्हणाला, ‘‘वेगवेगळ्या भागांतून पुण्यात शिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी आलेले विद्यार्थी केवळ पदवी घेऊन बसणार असतील, तर उपयोग काय? जे शिकतो आहे, ते अगदी मनापासून करायचे.’’