शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

शहरात नियोजनाअभावी पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 03:21 IST

नदीतून पाणी उचलण्याची महापालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याने विस्कळीत पाणीपुरवठ्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

पिंपरी : पवना धरणातून रावेतच्या नदीत पाणी सोडले जाते. पिंपरी-चिंचवड शहराला आरक्षणानुसार पाणी सोडले जाते. मात्र, नदीतून पाणी उचलण्याची महापालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याने विस्कळीत पाणीपुरवठ्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.महापालिकेला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत आणि रावेत येथील बंधाºयातून उपसा केंद्राद्वारे पाणी उचलले जाते. रावेतमधील पाणी पातळी कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेला असलेल्या आरक्षणानुसार ८५० एमएलडी ते ११०० एमएलडी पाणी सोडले जाते.रावेत बंधाºयातील पाण्याची पातळी कमी झाली किंवा रावेत येथील उपसा केंद्राच्या कामासाठी आठवड्यातून एकदा अघोषितपणे म्हणजेच गुरुवारी पाणीकपात केली जाते. दोन दिवसांपूर्वी रावेत बंधाºयातील पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले होते. दर बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा येणार नाही, असे प्रकटन दिले जाते.मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीपात्रात पाणी सोडले जाते. रावेत येथील बंधाºयातून महापालिका पाण्याचा उपसा करते. पाणी शुद्ध करून शहरवासीयांनी पाणीपुरवठा केला जातो. धरणातून पाणी सोडले जात असले, तरी प्रत्यक्षात रावेतपर्यंत पाणी येईपर्यंत मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. परिणामी रावेत बंधाºयातील पाण्याची पातळी कमी होते. यामुळे अशुद्ध जलउपसा केंद्रातील काही पंप बंद करावे लागतात. पाण्याचा उपसा कमी झाल्याने शहरातील पाण्याच्या टाक्या भरत नाहीत. परिणामी पाणी सोडण्याची यंत्रणा विस्कळीत होते. मागील आठवड्यात दोन दिवस सलग पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची ओरड आली, की पाणीपुरवठा विभागातील जबाबदार अधिकारी फक्त कारणे देतात. आज काय बंधाºयाची पातळी कमी झाली, उद्या काय टाक्याच भरल्या नाहीत. वीजपुरवठा खंडित झाला. जलवाहिनी फुटली, अशी कारणे देण्यात अधिकारी माहीर आहेत. स्वत:च्या चुका झाकण्यासाठी कारणे देण्यात अधिकारी धन्यता मानत आहेत. पाणीटंचाई झाली, की ती सुरळीत करण्यासाठी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभाग करीत असतो.आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्षमहापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरून रणकंदन झाल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उपाययोजना जाहीर केल्या होत्या. दहा दिवसांत पाणीपुरठा सुरळीत करण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे. मात्र, शहरातील अनेक भागात अजूनही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा सज्जड दम दिला आहे. मात्र, अजूनही पाणीपुरवठा विस्कळीत झालेला नाही. आयुक्तांच्या आदेशाला फाट्यावर दिले जात आहे, अशी तक्रार नागरिक करीत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड