'सुंदर स्वप्नात अजूनही मी रमलेय' असे म्हणत गौतमी देशपांडेने शेअर केले फोटो, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 07:00 AM2021-04-24T07:00:00+5:302021-04-24T07:00:00+5:30

अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने नुकतेच इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने नुकतेच इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

फोटो शेअर करत गौतमीने ‘I am still waking up from a lovely dream.... ❤️’ असं सुंदर कॅप्शन दिले आहे.

गौतमीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

तिच्या या फोटोंवर कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव होतो आहे.

तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.

झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेतून गौतमी देशपांडे घराघरात पोहोचली.

या मालिकेत गौतमी साकारत असलेली सईची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. माझा होशील ना ही मालिका चांगलीच लोकप्रिय होतेय.

गौतमीने कमी वेळात छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. या शिवाय ती एक उत्तम गायिका आहे.

अनेक वेळा ती गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. गौतमीला गाण्याचा वारसा तिच्या आजीकडून मिळाला आहे.