1 / 91. मागील काही महिन्यांपासून साडीमध्ये एक जबरदस्त ट्रेण्ड आला आहे... साडी, ब्लाऊज आणि त्यावर स्टायलिश जॅकेट.. बघा यंदाच्या लग्नसराईमध्ये हटके लूक हवा असेल तर या काही बॉलीवूड सेलेब्सचे स्टायलिश साडी- जॅकेट लूक एकदा बघून घ्या..2 / 92. बॉलीवूड फॅशनिस्टा सोमन कपूरचा हा लूकही खास आहे.. तिच्या ब्लाऊजची लांबी आणि बाह्या दोन्हीही खूप लांब नसल्याने उन्हाळ्यात ही फॅशन सहज करता येईल.3 / 93. तापसी पन्नूचा हा साडी विथ जॅकेट लूक सध्या चांगलाच गाजतो आहे. फिक्या रंगाची साधी साडी आणि त्यावर भरगच्च थ्रेडवर्क.. ही तिची स्टाईल सध्या आयकॅची ठरली आहे.4 / 94. स्टाईलच्या बाबतीत लोलो करिश्मा कपूरही अजिबातच मागे नाही. प्लेन शिफॉन साडी आणि त्यावर वर्क असणारं स्लिव्हलेस जॅकेट विथ बेल्ट हा करिश्माचा लूक मस्त जमून आला आहे. उन्हाळ्यासाठी तुम्ही अशा स्टाईलचा नक्कीच विचार करू शकता.5 / 95. शिल्पा शेट्टीचा हा लूक फॉर्मल वेअरकडे झुकणारा आहे. एखाद्या ऑफिस फंक्शनसाठी अशा पद्धतीचा लूक करायला हरकत नाही.6 / 96. काजोलचा हा लूकही अगदी वेगळा आहे. जॅकेटचा कपडा खूप काही हेवी वर्क असणारा नाही. त्यामुळे ही स्टाईलही उन्हाळ्यात करायला हरकत नाही. 7 / 97. काजोलचा हा आणखी एक लूक मध्यंतरी बराच गाजला होता. हा लूकही थोडा फॉर्मल गेटअप देणारा आहे. त्यामुळे ऑफिस फंक्शन्स, पार्टीसाठी तुम्ही अशा पद्धतीचं कलेक्शन तुमच्याकडे ठेवू शकता.8 / 98. साडी आणि स्टाईल या दोन्ही गोष्टीत माधुरीही अजिबातच मागे नाही. तिचं हे फ्रिलचं जॅकेट खरोखरंच आकर्षक आहे.9 / 99. नेहमीप्रमाणेच कतरिना तिच्या या लूकमध्येही अतिशय हॉट आणि ग्लॅमरस दिसते आहे. सिक्विन साडी आणि त्यावर भरगच्च सिक्विन वर्क असणारं जॅकेट हा तिचा लूक तुम्ही नक्कीच एखाद्या पार्टीसाठी करू शकता.