स्मृती इराणींपासून ते सुप्रिया सुळेंपर्यंत १० महिला खासदारांनी जुन्या संसदेच्या आठवणींचा संदेश लिहिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 17:40 IST
1 / 10नवीन संसद भवनाच्या प्रांगणात ध्वजारोहण केल्यानंतर १० महिला खासदारांनी जुन्या इमारतीशी संबंधित आठवणींचा संदेश लिहिला, यामध्ये पहिले नाव स्मृती इराणींचे आहे.2 / 10खासदार हरसिमरत कौर बादल यांनी लिहिले की, या इमारतीच्या १४४ खांबांशी माझ्या अनेक आठवणी निगडीत आहेत.3 / 10खासदार अनुप्रिया पटेल यांनी लिहिले की, जेव्हा मी पहिल्यांदा या इमारतीत पाऊल ठेवले तेव्हा मला असे वाटले की मी एका ऐतिहासिक वास्तूत पाऊल ठेवत आहे.4 / 10खासदार पूनम महाजन यांनी लिहिले की,अंतिम जय का वज्र बनाए, नव दधीचि हड्डियां गलाएं, आओ फिर से दीया जलाएं...5 / 10राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी लिहिले, या ठिकाणाचा इतिहास आणि तिथल्या सुंदर वास्तुकला, ज्याने जोरदार वादविवाद आणि कोलाहल पाहिला. या संसदेने एक मजबूत राष्ट्र म्हणून आपल्या प्रवासाला आकार दिला आहे.6 / 10खासदार रम्या हरिदास यांनी जुन्या संसदेला लोकशाहीचा राजवाडा आणि कठोर निर्णयांची जन्मभूमी म्हटले आहे.7 / 10खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला संसदेच्या सुंदर इमारतीचा भाग बनण्याची संधी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र आणि बारामतीच्या जनतेचे आभार मानते.8 / 10खासदार नवनीत राणा म्हणाल्या, जुन्या संसदेत पहिल्यांदा पाऊल ठेवल्याची आठवण आजही माझ्या मनात आहे.9 / 10राज्यसभा खासदार पीटी उषा यांनी लिहिले की, मी १९८६ मध्ये पहिल्यांदा संसदेला भेट दिली आणि २० जुलै २०२२ रोजी मी राज्यसभेची खासदार म्हणून पहिल्यांदाच संसदेत आले, हा माझ्यासाठी मोठा दिवस होता.10 / 10खासदार महुआ मोइत्रा म्हणाल्या, या इमारतीचे माझ्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान असेल, जसे कोणाचे तरी पहिले घर.