धक्कादायक! हॉलिवुड अभिनेत्रीचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू; अनेक दिवसांपासून होती बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 07:07 PM2022-02-20T19:07:10+5:302022-02-20T19:09:18+5:30

'जनरल हॉस्पिटल' आणि 'अमेरिकन हाऊसवाइफ' यांसारख्या प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही शोमध्ये काम केलेली हॉलिवुड अभिनेत्री लिंड्सी एरिन पर्लमॅन लॉस एंजेलिसमध्ये मृतावस्थेत आढळून आली आहे.

लिंड्सी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. लिंड्सी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तिला शोधण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घेतली होती.

लॉस एंजलिस येथील एका घरापाशी तिचा मृतदेह आढळलाय ज्याची माहिती नागरिकांनी लगेचच पोलिसांना दिली.

दरम्यान, अद्यापही तिच्या बेपत्ता होण्याचं आणि निधनाचं मुख्य कारण समोर आलेलं नाही.

लिंड्सी ही मुळची शिकागोची. लॉस एंजलिसला येण्याआधी तिनं बराच काळ नाटकांमध्ये काम केलं होतं.