शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतात पहिल्यांदाच आले सर्वात मोठे जहाज; चार फुटबॉलचे मैदान होतील एवढी आहे जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 13:55 IST

1 / 7
देशाच्या सागरी आणि बंदर उद्योगासाठी २६ मे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. लॉजिस्टिक कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने भारतातील सर्वात प्रमुख बंदर मुंद्रा बंदरावर रविवारी सर्वात मोठ्या कंटेनर जहाजाचे स्वागत करून आणखी एक विक्रम केला.
2 / 7
हे जहाज मेडिटेरेनियन शिपिंग कंपनी (MSC) चे आहे, हे जहाज २६ मे रोजी मुंद्रा बंदरावर आले, जे बंदर आणि देशाच्या सागरी उद्योग या दोन्हीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. MSC ANNA हे एक मोठे जहाज आहे, या जहाजची एकूण लांबी अंदाजे ३९९.९८ मीटर आहे, हे चार फुटबॉल मैदानांच्या बरोबरीचे आहे. त्याची क्षमता १९,२०० TEU आहे. भारतीय बंदराच्या इतिहासातील सर्वात मोठे मोठे कंटेनर जहाज आहे.
3 / 7
MSC ANNA हे एक मोठे जहाज आहे, जे अल्ट्रा लार्ज कंटेनर व्हेसल्सच्या श्रेणीशी संबंधित आहे, ही श्रेणी फक्त जगातील निवडक बंदरांवर जात असते. बर्थिंगसाठी १५.२ मीटर किंवा त्याहून अधिक ड्राफ्ट आवश्यक आहे.
4 / 7
या जहाजाची एकूण लांबी ३९९.९८ मीटर आहे, ही जवळपास चार फुटबॉल मैदानांएवढी आहे. हे जहाज एका वेळी १९,२०० TEU कंटेनर लोड करू शकते. पहिल्यांदाच एवढं मोठं जहाज भारतीय बंदरात दाखल झालं आहे.
5 / 7
त्याचा अराइव्हल ड्राफ्ट १६.३ मीटर आहे, जो फक्त अदानी पोर्ट्स, मुंद्रा येथे आणला जाऊ शकतो. भारतातील इतर कोणतेही बंदर डीप-ड्राफ्ट जहाजांना थांबवून ठेवण्यास सक्षम नाही.
6 / 7
या आधीही जुलै २०२३ मध्ये, अदानी पोर्ट्स, मुंद्रा यांनी जगातील सर्वात लांब कंटेनर जहाजांपैकी एक, MV MSC हॅम्बुर्ग या जहाजातून एक विक्रम केला आहे. या जहाजाची एकूण लांबी ३९९ मीटर आणि क्षमता १६,६५२ TEU आहे. यातून जगातील सर्वात मोठी जहाजे हाताळण्याची बंदराची क्षमता दिसून आली.
7 / 7
अदानी पोर्ट्स, मुंद्रा हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित केले आहे. या बंदरावर जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे बंदर ३५,००० एकरांवर पसरले आहे. सध्या हे भारतातील सर्वात मोठे व्यावसायिक बंदर बनले आहे.