बाबो...! झरीन खानने बाथटबमध्ये केले ग्लॅमरस फोटोशूट, फोटोंची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 07:05 PM2021-03-10T19:05:03+5:302021-03-10T19:05:03+5:30

बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच तिने बाथटबमध्ये फोटोशूट केले आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे.

या फोटोत झरीन खान बाथटबमध्ये दिसते आहे. झरीन खानचा हा फोटो चाहत्यांना खूप भावतो आहे.

झरीना खानच्या या फोटोला आतापर्यंत २ लाखांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत.

झरीन खानने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ते विचारतात, तुझी सुपर पॉवर काय आहे? त्यावर मी सांगते की मी एक महिला आहे.

झरीन खान चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी एकही संधी सोडत नाही.

झरीन खानने सलमान खानचा चित्रपट वीर मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

झरीन खान बऱ्याचदा फोटोंमुळे चर्चेत येत असते.

झरीन खानचे सोशल मीडियावर ९.४ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.