कोण आहे सुहाना खानची कझिन आलिया छिब्बा? फोटो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 08:00 AM2020-11-05T08:00:00+5:302020-11-05T08:00:03+5:30

सुहाना इतकीच सुंदर आहे आलिया

शाहरूख खानने काल-परवाच आपला 55 वा वाढदिवस दुबईत साजरा केला. यावेळी गौरी खानचा भाऊ विक्रांत छिब्बाची मुलगी आलिया छिब्बाही हजर होती. शाहरूखची लेक सुहाना खान हिच्याप्रमाणे आलिया छिब्बा ही सुद्धा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. आज तिच्याचबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आलिया ही गौरीच्या भावाची मुलगी आहे. म्हणजे, गौरीची भाची आहे. सुहाना व गौरी दोघी कझिन आहेत. दोघींमध्येही खास बॉन्डिंग आहे.

सुहाना खान हिच्याप्रमाणेच आलिया सुद्धा ग्लॅमरस आयुष्य जगते. तिचे सोशल मीडियावरचे ग्लॅमरस फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही त्याचा अंदाज येईल.

अर्थात सुहाना खानप्रमाणे फिल्म इंडस्ट्रीत येण्याचा तिचा कोणताही इरादा नाही.

आलिया फॅशन डिझाईनर आहे आणि तिला तिचा स्वत:चा फॅशन ब्रँड सुरु करायचा आहे.

कोरोना महामारीच्या काळात तिने सॉक्सची लाईन लॉन्च केली होती. शिवाय डिझाईनर मास्कही लॉन्च केले होते. तिच्या ब्रँडमध्ये अशा अनेक फंकी असेसरिज आहेत.

आलिया विवाहित आहे. गतवर्षी कोलकात्यात तिचे लग्न झाले होते. शाहरूख, गौरी, सुहाना असे सगळे या लग्नाला हजर होते.

या लग्नाचे फोटो सुहाना खानने सोशल मीडियावर शेअर केले होते.

सौंदर्याच्या बाबतीत ती सुहानापेक्षा जराही कमी नाही. सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.