अरे बापरे घाबरलो ना मी, वरुण धवनचा पत्नी नताशासोबतचा फोटो पाहून चाहत्यांना भरली धडकी, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 12:02 PM2021-02-11T12:02:40+5:302021-02-11T12:10:07+5:30

वरुण धवन आणि नताशा दलाल यांचे अलिबागमध्ये नुकतेच धुमधडाक्यात लग्न झाले. अलिबागेतील द मेन्शन हाऊस या अलिशान रिसॉर्टमध्ये अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित वरूण व नताशाचा लग्नसोहळा पार पडला होता.

लग्नसोहळा अतिशय खासगी होता. सोहळ्यांचे फोटो लीक होऊ नयेत म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अगदी मोबाईल वापरण्यासही बंदी करण्यात आली होती.

लग्नाआधीपासून दोघे खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे लग्नानंतरही या दोघांची नाते अधिक घट्ट झाले आहे.

दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.

सध्या पत्नी नताशा सोबत वरुण क्वॉलिटी टाईम एन्जॉय करतोय.

अधून मधून त्यांचे फन टाईमचे फोटोही तो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

लग्नाच्या फोटोंनाही रसिकांनी लाईक्स आणि कमेंट देत शुभेच्छाही दिल्या होत्या.

मात्र लग्नातला नताशाचा अंदाज पाहून नेटीझन्सने त्यावेळी तिला ट्रोल केले होते.

वरुणची दुल्हनियाँ बनलेली नताशा नववधू वाटतच नसल्याचे सांगत तिची खिल्ली उडवली होती.

आताही वरुणने त्याचा नवीन फोटो शेअर केला आहे, फोटोमध्ये नताशाला काहींनी तर ओळखलेच नाही.

त्यामुळे कमेंट करत तिची खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे.