निजामुद्दीन मरकज घटनेवर नवाझुद्दीन सिद्दीकी आणि ऋषी कपूर यांनी दिल्या या प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 08:00 AM2020-04-03T08:00:00+5:302020-04-03T08:00:02+5:30

दिल्लीतील निजामुद्दीनच्या मरकजच्या कार्यक्रमात देशातील विविध जिल्ह्यातून 1400 जण सहभागी झाले होते.

दिल्लीतील निजामुद्दीनच्या मरकजच्या कार्यक्रमात उत्तर प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, पश्मिच बंगाल अशा विविध भागांहून अनेक लोक आले होते. यातील अनेक लोक कोरोना पॉझिटिव्ह असू शकतात असा अंदाज लावला जात आहे.

इंडिया टिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या सगळ्या प्रकरणावर नवाझुद्दीनने एक व्हिडिओद्वारे आपले मत मांडले आहे. या व्हिडिओत तो बोलताना दिसत आहे की, कोणीही अशाप्रकारे इतरांचा जीव धोक्यात टाकू शकत नाही.

नवाझुद्दीन लॉकडाऊनचे समर्थन करत आपले मत व्यक्त करत आहे. तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल तरी तुम्ही इतरांच्या जीवाला धोक्यात टाकू शकत नाही. सरकार घराच्या बाहेर पडू नका... असे ज्या कळवळीने सांगत आहे. ते सगळ्यांनीच ऐकणे गरजेचे आहे.

अभिनेते ऋषी कपूर यांनी देखील या प्रकरणावर ट्वीट द्वारे आपले मत व्यक्त केले आहे.

ऋषी कपूर यांनी काही दिवसांपूर्वी देशात इर्मजन्सीची गरज असल्याचे ट्वीटरद्वारे म्हटले होते. याच ट्वीटचा पुन्हा उल्लेख करत त्यांनी म्हटले आहे की, याच कारणामुळे आपल्या देशात सध्या आणीबाणीची गरज असल्याचे मी म्हटलो होतो.

ऋषी कपूर यांचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

ऋषी कपूर यांच्या ट्वीटवर अनेक लोक कमेंट करत आहेत.