PHOTOS : मलायका अरोराचे हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, झक्कास!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 11:01 AM2021-09-05T11:01:04+5:302021-09-05T11:09:58+5:30

होय, मलायकाने एक झक्कास फोटोशूट केलेय आणि या फोटोशूटचे फोटोही एकदम झक्कास आहेत. या फोटोंवरून तुमची नजर हटणार नाही.

मलायका अरोरा पुन्हा चर्चेत आहे. होय, मलायकाने एक झक्कास फोटोशूट केलेय आणि या फोटोशूटचे फोटोही एकदम झक्कास आहेत. या फोटोंवरून तुमची नजर हटणार नाही.

मलायकाने इन्स्टाग्रामवर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती वेगवेगळ्या हटके पोज देताना दिसतेय. तिचे हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

मेटॅलिक मरमेड गाऊनमध्ये मलायकाचे सौंदर्य आणखीच खुलून आले आहेत. या ड्रेसमधील तिच्या फोटोंंनी चाहत्यांना अगदी खल्लास केले आहे.

डीप नेक गाऊनमधील या फोटोतील मलायकाची एक एक अदा घायाळ करणारी आहे. दोन लाखांवर लोकांनी तिच्या या फोटोंना लाईक केले आहे.

मलायकाची ही मेटॅलिक मरमेड गाऊन फॅशन डिझाईनर मेनका हरीसिंघानीने डिझाईन केली आहे. या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सही एकापेक्षा एक भारी आहेत.

आज माझे लग्न आहे, तूच सांग मी पळून जाऊ? अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. एका चाहत्याने, व्वा, ब्ल्यू लेडी असे म्हणत मलायकाच्या या फोटोंचे कौतुक केले आहे.

मलायका सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह दिसते. स्वत:चे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो ती शेअर करत असते.

मलायका सध्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या रिलेशनशिपमुळे ती सतत चर्चेत असते. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे मानले जात आहे.