कोट्यावधी रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे हनी सिंह, एका गाण्यासाठी घेतो इतकी रक्कम!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 01:55 PM2021-08-04T13:55:56+5:302021-08-04T14:02:21+5:30

Honey Singh Property : हनी सिंहचं खरं नाव हिरदेश सिंह आहे. स्टेजवर परफॉर्म करताना त्याने त्याचं नाव हनी सिंह असं ठेवलं.

हाय हिल्स, अंग्रेजी बीटसारख्या एकापेक्षा एक गाण्याने फॅन्समद्ये गायक हनी सिंहची जोरदार चर्चा आहे. हनी सिंहवर कौटुंबीक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनी सिंहची पत्नी शालिनी तलवारने त्याच्यावर हिंसेचा आरोप केला आहे. आज तो पत्नीने केलेल्या हिंसाचाराच्या आरोपामुळे चर्चेत असेल. पण तो एक असा रॅपर आहे जो नेहमीच फॅन्सच्या मनात घर करून आहे.

हनी सिंहचं खरं नाव हिरदेश सिंह आहे. स्टेजवर परफॉर्म करताना त्याने त्याचं नाव हनी सिंह असं ठेवलं.

हनी सिंहने त्याच्या करिअरची सुरूवात यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून केली होती. आज लाखो फॅन्सच्या मनात घर करून असलेला हनी सिंह कोट्यावधी रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे.

हनी सिंह या भारतातील सर्वात श्रीमंत रॅपर मानला जातो. मीडिया रिपोर्टनुसार हनी सिंह साधारण १७३ कोटी रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे.

इतकंच नाही तर मीडिया रिपोर्टमद्ये सांगण्यात आलं आहे की, रॅपर हनी सिंह दरवर्षी साधारण ४२ कोटी रूपयांच्या आसपास कमाई करतो. हनी सिंहकडे २५ मिलियन यूएस डॉलरची संपत्ती आहे. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम १७३ कोटी रूपयांच्या आसपास होते.

हनी सिंहची अर्धी कमाई त्याच्या गायनातून होते. हनी सिंह एक गाणं गाण्यासाठी १५ लाख रूपये घेतो. हनीच्या संपत्तीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. इतकंच नाही तर हनी सिंह देशातील सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्या लोकांपैकी एक आहे.

हनी सिंहला गाड्यांची फार आवड आहे. हेच कारण आहे की, त्याच्या गाण्यांमध्ये स्टायलिश कार दाखवल्या जातात. त्याच्या वेगवेगळ्या कार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार त्याच्याकडे ऑडी क्यू 7, ऑडी आर8, जेगुआर,रोल्स, बीएमडब्ल्यू या कार आहेत.

हनी सिंहकडे देशातील वेगवेगळ्या भागात घर आहे. नोएडामध्ये त्याने नुकतंच एक घर खरेदी केलं. त्यासोबत पंजाबमध्ये ३ कोटी रूपयांचं घर आहे. तर गुडगांव, दिल्ली आणि मुंबईतही त्याचे आलिशान घरे आहेत.