मुंबईत एंट्री करण्यापूर्वीच कंगना राणौतची कोरोना टेस्ट आली निगेटीव्ह, BMC आताही करणार क्वारंटाइन ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 01:48 PM2020-09-09T13:48:58+5:302020-09-09T14:11:55+5:30

अभिनेत्री कंगना रणौत चंडीगढवरुन मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. कोणत्याही क्षणी ती मुंबईत दाखल होईल. (Photo Instagram)

महापौर किशोरी शहाणे यांनी कंगनाला मुंबईत आल्यानंतर क्वारांटाईन करण्यात येईल असे वक्तव्य केले होते. (Photo Instagram)

कंगनाने मुंबईत येण्या आधीच कोरोनाचा टेस्ट केली आहे.(Photo Instagram)

मंगळवारी रात्री उशीरा कंगनाचा कोरोना रिपोर्टदेखील आला आहे. यात तिची टेस्ट नेगेटीव्ह आली आहे. (Photo Instagram)

त्यामुळे आता टेस्ट नेगेटीव्ह आल्यानंतरही मुंबई महापालिका तिला क्वारांटाईन करणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. (Photo Instagram)

कंगना राणौतच्या पाली हिलमधील कार्यालयावर मुंबई महापालिकेनं कारवाई केली आहे. (Photo Instagram)

कार्यालयात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं झाल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं होतं. नोटिशीत दिलेली २४ तासांची मुदत संपल्यानंतर पालिकेनं आज सकाळपासून कारवाईला सुरुवात केली.(Photo Instagram)

उच्च न्यायालयाने यावर निकाल देत ही कारवाई थांबवण्याचे आदेश दिले आहेत. (Photo Instagram)

कंगना आणि तिच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईवर कुठेही बोलू नका, असे आदेश शिवसेना नेतृत्त्वाकडून पक्ष प्रवक्त्यांना देण्यात आले आहेत. 'कंगनाला जास्त महत्त्व देऊ नका. (Photo Instagram)

राणी लक्ष्मीबाईचं धाडस, शौर्य आणि बलिदान मी सिनेमाच्या माध्यमातून जगले आहे. हे लोक मला माझ्या महाराष्ट्रात येण्यापासून रोखत आहेत याचं दु:ख आहे. मी राणी लक्ष्मीबाईच्या मार्गावर चालत आहे. मी कोणालाही घाबरणार नाही आणि झुकणारही नाही. चुकीच्या गोष्टींविरोधात सतत आवाज उचलत राहणार आहे, जय महाराष्ट्र, जय शिवाजी असंही कंगनानं ट्विटमधून शिवसेनेचं नाव न घेता बजावलं आहे. (Photo Instagram)