लाइट ग्रीन रंगाच्या साडीत जान्हवी कपूरने दिल्या किलर पोझ; फोटो पाहताच चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 05:04 PM2022-05-04T17:04:12+5:302022-05-04T17:08:32+5:30

Janhvi kapoor:कलाविश्वासह जान्हवी सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

उत्तम अभिनयासह बिंधास्त फॅशन कॅरी करण्याच्या अंदाजामुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पावलावर पाऊल ठेवत जान्हवीने कलाविश्वात पदार्पण केलं आहे.

कलाविश्वासह जान्हवी सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

अलिकडेच जान्हवीने लाइट ग्रीन रंगाच्या साडीत छान फोटोशूट केलं. हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये जान्हवीने किलर पोझ दिल्या आहेत.

जान्हवीने परिधान केलेली साडी लाइट ग्रीन रंगाची असून त्यावर प्रिंटेड डिझाइन आहे.

या साडीला क्लासी लूक यावा यासाठी जान्हवीने कानात मोठे इअररिंग्स घातले आहेत. तर केसही मोकळे सोडले आहेत.

जान्हवीच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

सध्या जान्हवी तिच्या आगामी चित्रपटांमध्ये बिझी आहे. लवकरच ती 'गुड लक जेरी' आणि 'दोस्ताना 2' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.