राझी ते थप्पड व्हाया मिशन मंगल; नारीशक्तीची 70mm भरारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 06:06 PM2020-03-07T18:06:19+5:302020-03-07T18:50:02+5:30

'मिशन मंगल'- मिशन मंगल हा चित्रपट मंगळ प्रकल्पावर आधारित आहे. या चित्रपटात विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन आणि कीर्ति कुल्हारी यांच्या अभिनयाचे खुप कौतुक झाले होते.

'राझी- आलिया भट्टचा 'राझी' हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आलियाने एका गुप्तहेराची भुमिका साकारली होती. स्त्रीनं आपल्या देशासाठी सर्वस्व पणाला लावलं हे या चित्रपटात दर्शवले आहे.

'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी'- 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी' हा चित्रपट झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात कंगनाचं धाडसी आणि साहसी रुप पाहायला मिळतं.

'थलायवी' - 'थलायवी' हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे.या चित्रपटात कंगनाने जयललिता यांची भूमिका साकारली आहे.

'नीरजा' -'नीरजा' हा चित्रपट नीरजा भनोट हीच्या सत्यघटनेवर आधारित आहे. दहशदवाद्यांकडून हायजॅक केल्या गेलेल्या विमानातील प्रवाशांना वाचवण्यासाठी नीरजा भनोटला आपले प्राण गमवावे लागले.

'पंगा'- 'पंगा' या चित्रपटात कंगनाला राष्ट्रीय कबड्डी खेळाडू दाखवण्यात आली आहे. हा एक मध्यमवर्गीय भारतीय स्त्रीची गोष्ट आहे. आकांक्षा,संकटं सयंम या सर्वाशी पंगा घेणाऱ्या गृहीणीची ही कथा आहे.

'कहानी'- विद्या बालनने तिच्या बर्‍याच चित्रपटांमध्ये शूर स्त्रीच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. 'कहानी' या चित्रपटात विद्या गर्भवती महिला दाखवली असून या चित्रपटात तिने आपल्या पतीची हत्या करणाऱ्या लोकांचा सुड घेऊन पतीला न्याय कसा न्याय मिळून दिला हे दर्शवले आहे.

‘थप्पड’- एखाद्या घटनेचा पश्चाताप करणं म्हणजे काय? पश्चातापानंतर सगळं सुरळीत होईल का? अशा काही प्रश्नाची उत्तरही 'थप्पड' हा सिनेमा देतो.

'छपाक'- 'छपाक' हा चित्रपट अॅसि़ड अटॅक लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणने महत्त्वाची भुमिका साकारली आहे. हा चित्रपट आशा आणि विजयाची गाथा आहे.

'मेरी कॉम'- 'मेरी कॉम' ही भारतीय बॉक्सरची खरी कहाणी आहे.या चित्रपटात मेरी कॉमच्या यशस्वी प्रवासाची कथा दाखवली आहे.प्रियंका चोप्राने या चित्रपटात मेरी कॉमची भुमिका साकारली आहे.