दिपिकाला पाहून चाहत्यांना आली रणवीरची आठवण, मिळतायेत अशा प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 10:26 AM2021-09-15T10:26:39+5:302021-09-15T10:34:01+5:30

दीपिका पदुकोणची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहतात. जेव्हा जेव्हा ती दिसते तिला पाहून तुम्ही फिदा नाही झालं तरच नवल. गेल्या काही वर्षापासून दिपिकाने तिच्या स्टाईलमध्येही प्रचंड बदल केला आहे.

अमेझिंग, सुंदर गॉर्जस असे शब्द तिला पाहताच चाहते बोलायचे आता तिला पाहून चक्क हैराण होत आहेत.

अतरंगी स्टाईल करत ती मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाली.

हिरव्या चेक्स ड्रेसिंगमध्ये ती स्पॉट झाली होती.

तिला पाहूनच वेगवेगळ्या कमेंट करत चाहते तिची खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळतंय.

यावेळी दिपिकाला पाहून चाहते रणवीर सिंहचीच आठवण काढताना दिसत आहे.

कारण रणवीरदेखील सगळ्यांत जास्त अतरंगी स्टाईलमुळेच जास्त चर्चेत असतो.

त्याचपाठोपाठ आता दिपिकाही अतंरगी स्टाईलमुळेच जास्त चर्चेत असते.

गेल्या काही वर्षापासून दिपिकाने तिच्या स्टाईलमध्येही प्रचंड बदल केला आहे.

तिची स्टाईलदेखील सर्वांसाठी आकर्षणच ठरत असते.

सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळेच तिलाही ट्रोल केले जात असते.