PICS : बॉलिवूड सेलिब्रिटींचे मास्क; काही हटके, काही मजेदार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 05:25 PM2021-01-13T17:25:07+5:302021-01-13T17:37:38+5:30

रणबीर कपूर ते सनी लिओनी...

कोरोनाच्या काळात मास्क आपल्या सर्वांच्याच आऊटफिटचा एक महत्त्वाचा घटक बनला आहे. पण म्हणून फॅशनशी तडजोड नाहीच. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मास्कवरून तुम्हाला याची खात्री पटेल.

अभिनेत्री अदा शर्मा हिच्या फंकी मास्कची सध्या जोरदार चर्चा आहे. तिचे मास्क फंकी नाहीत तर फनीही आहेत.

रणवीर सिंगचा सेकंड नंबर. अतरंगी फॅशनसाठी ओळखल्या जाणा-या रणवीरचा हा मास्क एकदा बघाच.

रणबीर कपूरचा अलीकडे असा मास्क घालून दिसला की, त्याच्या मास्कची जोरदार चर्चा झाली.

अनिल कपूरचा हा पिंक मास्क आहे ना खास?

जोकरच्या या मास्कमागे कोणाचा चेहरा तर अभिनेता गौरव कपूरचा.

सनी लिओनीचा हा मास्क आहे ना एकदम युनिक.

सलमान खानची बातच न्यारी. त्याच्या being human या ब्रँडचा मास्क सध्या बाजारातही विक्रीस आहे.

साऊथ स्टार विजय देवरकोंडा हा मास्क आहे ना हटके

अनुष्का दांडेकरने लव्ह युवरसेल्फचा मॅसेज देणारा मास्क घातला. म्हणजे सुरक्षा तर सुरक्षा सोबत संदेश.

करिश्मा तन्नाच्या स्टाईलिश मास्कवर सर्वांच्या नजरा खिळल्या.

सारा अली खानचा हा मॅचिंग मास्कचीही चर्चा झाली.