वाचा, मुग्धा गोडसे व राहुल देवची लव्हस्टोरी; पाहा रोमॅन्टिक कपलचे रोमॅन्टिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 01:40 PM2021-07-26T13:40:13+5:302021-07-26T13:49:09+5:30

अभिनेत्री मुग्धा गोडसे फिल्मी जगापासून सध्या दूर आहे. आज मुग्धाचा वाढदिवस.

अभिनेत्री मुग्धा गोडसे फिल्मी जगापासून सध्या दूर आहे. आज मुग्धाचा वाढदिवस.

मुग्धाने 2002 मध्ये मेगा मॉडेल हंट जिंकून तिच्या मॉडेलिंग कारकीर्दीची सुरूवात केली. यानंतर मुग्धाला बºयाच मॉडेलिंगच्या आॅफर येऊ लागल्या. 2004 साली मुग्धाने मिस इंडिया स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली.

मुग्धा तिच्या लव्ह लाईफला घेऊन चर्चेत असते. तिच्यापेक्षा 14 वर्षांनी मोठा असलेला अभिनेता राहुल देवला ती डेट करते आहे.

मुग्धा व राहुलची पहिली भेट 2013 साली एका मैत्रिणीच्या लग्नात झाली होती. इथून मैत्री झाली आणि पुढे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.

राहुल मुग्धापेक्षा 14 वर्षांनी मोठा आहे. पण वयातील हे अंतर त्यांच्या प्रेमाच्यामध्ये कधीच आले नाही.

मुग्धा आयुष्यात येण्याआधी राहुलचे लग्न रिनाशी झालं होतं. त्या दोघांना एक मुलगा देखील आहे. पण 2009 मध्ये रिनाचे कर्करोगाने निधन झाले. रिनाच्या निधनानंतर काहीच वर्षांनी मुग्धा त्याच्या आयुष्यात आली.

मुग्धाने 2008 मध्ये मधुर भंडारकरच्या फॅशन या चित्रपटातून डेब्यू केला होता. यांनतर तिने आॅल द बेस्ट, हेल्प, जेल, हिरोईन अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

राहुलने चॅम्पियन, अशोका आणि एन्टॉप हिल या चित्रपटात काम केले आहे. खूपच कमी जणांना माहीत आहे की, मुग्धाने या क्षेत्रात येण्यापूर्वी पेट्रोल पंपावर देखील काम केले आहे. तिथे तिला दिवसाला केवळ 100 रुपये मिळत असे. पण तरीही तिने हे काम अनेक दिवस आनंदाने केले.

राहुल-मुग्धा हे दोघं प्रत्येक पार्टीत आणि कार्यक्रमात एकत्र दिसतात. दोघांच्या सोशल मीडिया पोस्टवरून तुम्हाला त्यांच्या केमिस्ट्री आणि बॉन्डिंगची कल्पना येईल.