बिपाशा बासूचे बदलले मूड शेअर केले Bold and Beautiful फोटो, चाहते झालेत लट्टू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 11:45 AM2020-07-22T11:45:24+5:302020-07-22T11:53:44+5:30

बिपाशाच्या या अदांवर व्हाल फिदा...

लग्नानंतर बिपाशा बासूने एकही सिनेमा केलेला नाही. पण सोशल मीडियावर मात्र ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे.

बिपाशाने नुकतेच सोशल अकाऊंटवर तिचे काही थ्रोबॅक फोटो शेअर केलेत.

बिपाशाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

मूड... स्वत:वर प्रेम करा... असे या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने म्हटले आहे. अन्य एका फोटोला तिने दिलेले कॅप्शनही सुंदर आहे. मला शोधणे कठीण आहे आणि विसरणे अश्क्य, असे तिने लिहिले.

बिपाशा सध्या तिचा पती करण सिंग ग्रोव्हरसोबत क्वारंटाईनमध्ये आहे.

यापूर्वीही बिपाशाने काही जुने फोटो शेअर केले होते. तेही तुफान व्हायरल झाले होते.

बिपाशाचे इन्स्टाग्रामवर 80 लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

याआधी देखील बिपाशाचे बोल्ड अंदाजातील अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.

बिपाशा व करणबद्दल सांगायचे तर दोघांनी 30 एप्रिल 2016 रोजी लग्न केले होते.

करणचे हे तिसरे लग्न होते. सध्या बिप्स व करण दोघेही आपल्या संसारात आनंदी आहेत. दोघेही रोमॅन्टिक लाईफ जगत आहेत.

Read in English