पालम : तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंचाची पंचायत समिती सभागृहात २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी महिला सरपंचांची उपस्थिती होती.
कार्यशाळेचे उद्घाटन कृउबा सभापती ॲड. विजयकुमार शिंदे यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती अण्णासाहेब किरडे, गटविकास अधिकारी आर. व्ही. चकोर, सोपान कुरे, माधवराव गिणगिणे, विस्तार अधिकारी रेवणवार, रमेश गायकवाड उपस्थित होते. पालम तालुक्यात प्रत्येक गावात पुढील पाच वर्षासाठी विकास कामाचे नियोजन करण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत आमचा गाव आमचा विकास अभियान राबविण्यात येणार आहे. यात गाव पातळीवर कामाचे कसे नियोजन करावे व आराखडा कसा तयार करावा, याची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच गाव विकासासाठी शासनाच्या असलेल्या योजनेचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच पंचायत समितीकडून स्वागत करण्यात आले. कार्यशाळेला मोठ्या संख्येने सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.