गंगाखेड: / /येथील बसस्थानकातील जलकुंभ नियोजनाअभावी बंद पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. गंगाखेड बसस्थानकात आगाराच्या वतीने प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे बंधनकारक असते. परंतु, याचे गांभीर्य आगारप्रमुखांना नसल्याचे दिसून येत आहे. बसस्थानक परिसरात शहरातील काही दानशूर व्यक्तींनी १0 ते १२ तोट्या (नळ) असलेला जलकुंभ उभारून दिला आहे. तसेच विंधन विहीरही खोदून दिली. या विहिरीपासून जलकुंभापर्यंत पाणी पोहचविण्याची सोय केली. परंतु, आगारातील कर्मचार्यांचे दुर्लक्ष व नियोजनाअभावी जलकुंभात पाण्याचा ठणठणाट राहू लागला आहे. त्यामुळे प्रवाशांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. सर्वसोयींयुक्त असलेला जलकुंभ मात्र शोभेची वस्तू बनला आहे. बंद पडलेली पाणपोई (जलकुंभ) तत्काळ सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. /(प्रतिनिधी) प्रवाशांमध्ये नाराजी४/गंगाखेड बसस्थानकात दररोज हजारो प्रवासी येतात. परंतु, या परिसरात बांधण्यात आलेले दोन जलकुंभ पाण्याविना शोभेची वास्तू बनले आहेत. ४/ग्रामीण भागातून येणार्या प्रवाशांना नाईलाजास्तव विकतचे पाणी घेण्याची वेळआली आहे. पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. व्यावसायिकांचा फायदा४/गंगाखेड बसस्थानकात पाणपोई पाणी नसल्यामुळे प्रवासी विकतचे पाणी पिण्यासाठी घेत आहेत. त्यामुळे या परिसरातील व्यवसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. आगारप्रमुखांच्या वतीने प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याचे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही.
गंगाखेड बसस्थानकात पाण्याचा ठणठणाट
By admin | Updated: January 27, 2015 12:29 IST