बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने १६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष साळवे साडेगावकर, लखन चव्हाण, लताबाई एंगडे, प्रमोद लाटे, दीपक शिंदे, राजीव गांधारे, शेख सरफराज, शेख अजीम, अय्युब खान, शेख इस्माईल, वाजीद पठाण, शेख अय्युब यांची उपस्थिती होती. शहरातील विविध प्रभागांमध्ये रविवारी झालेल्या अतिवृष्टीने अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. याबाबत १३ जुलै रोजी प्रशासनाकडे निवेदन सादर करून, सदर कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू, तसेच नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मागील सहा दिवसांपासून अडचणीत असलेल्या नागरिकांच्या सोयीसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने प्रशासनाला पावसाचे पाणी भेट देऊन आंदोलन करण्यात आले. या सर्व कुटुंबांना प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी, तसेच घरकूल देत, आपत्कालीन निधी द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
नुकसान भरपाईसाठी पाणीभेट आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:14 IST