शहरातील म्युनिसिपल कॉलनी भागातील विलास बाबाराव रेंगे यांनी गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास त्यांची एमएच २२ एजे ०४७७ क्रमांकाची दुचाकी जामनाका भागातील पोलीस चौकी परिसरात उभी केली होती. त्यानंतर ते मित्रासोबत बाजूच्या हॉटेलमध्ये चहा घेत असताना प्रमोद गणेशराव सावंत (रा. करडगाव ता.सेलू) हा त्यांची दुचाकी चोरून नेत होता. यावेळी तातडीने धाव घेऊन रेंगे यांनी त्यास पकडले व त्याला दुचाकी का घेऊन जात आहेस? अशी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी पडघण आले. त्यानंतर चोरट्यास त्यांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत विलास रेंगे यांनी याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार दिली. त्यावरून आरोपी प्रमोद गणेशराव सावंत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी चोरास रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:21 IST