परभणी : गैरशिस्तीचे वर्तन व शालेय कामकाजातील अनियमितता यामध्ये दोषी ठरलेल्या जिंतूर तालुक्यातील मांडवा येथील शिक्षकास जि. प. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी निलंबित केले आहे. मांडवा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मनोज वैजनाथअप्पा तोडकर यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा पदभार असताना त्यांनी गैरशिस्तीचे वर्तन व शालेय कामकाजातील अनियमितता असल्याचा अहवाल अधिकार्यांकडे सादर करण्यात आला. चौकशीअंती तोडकर यांनी शाळेतील वेळापत्रक तयार केले नाही. बैठकीचा इतवृत्तांत अद्यावत ठेवला नाही, सर्वंकक्ष मूल्यमापनाच्या नोंदणी अद्यावत ठेवल्या नाहीत, शाळेतील शौचालयचा वापर न करता कुलूप लावून ठेवले, नियमित पालकसभा घेतल्या नाहीत, आदी कारणावरुन त्यांना निलंबित केले असल्याचे आदेश सीईओं सुभाष डुंमरे यांनी काढले आहेत. तोडकर यांना निलंबित कालावधीत पाथरी पंचायत समिती हे मुख्यालय देण्यात आले आहे. / |
बेशिस्तीच्या कारणावरुन शिक्षक निलंबित
By admin | Updated: January 28, 2015 14:01 IST