शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीची निवडणूक लांबणीवर

By admin | Updated: January 27, 2015 12:28 IST

विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीनंतरच मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्यावी, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

मानवत : विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीनंतरच मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्यावी, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लांबणीवर पडली आहे. मानवत बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. बाजार समितीच्या प्रारुप मतदार तसेच अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होऊन निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्तीची अधिसूचनाही काढली होती. परंतु, औरंगाबाद खंडपीठात सावळी येथील माणिक काळे यांनी याचिका दाखल केल्याने ही प्रक्रिया बंद पडली. बाजार समितीच्या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सोयायटी मतदार संघातून ११ जागा, ग्रामपंचायत संघातून ४ जागा, व्यापारी मतदार संघातून २ जागा व हमाल-मापाडी मतदार संघातून १ जागा अशा एकूण १८ जागा आहेत.बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण ३४ विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आहेत. यापैकी २0११ ते मार्च २0१३ पर्यंत पंधरा सोसायटीची मुदत संपली आहेत. परंतु, विविधकारणांनी या सोसायटींच्या निवडणुका झाल्या नाहीत. परिणामी रामेटाकळी, हमदापूर, भोसा, मंगरूळ (बु.), हटकरवाडी, किन्होळा, नागरजवळा, आंबेगाव, पिंपळा, आटोळा, राजूरा, नरळद, केकरजवळा, रत्नापूर, गोगलगाव या गावातील सोसायटीच्या सभासदांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करता येणार नव्हते. त्यामुळे मोठय़ा मतदार संघातील प्रतिनिधीत्वकमी होऊन केवळ १९ सोसायटीतीलच सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळणार होता. त्यामुळे अगोदर सोसायटींची निवडणूक व्हावी व नंतरच बाजार समितीची निवडणूक घ्यावी, अशी याचिका माणिक काळे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अगोदर विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक घेऊन नंतरच कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्यावी, असे आदेश दिले. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक लांबणीवर पडली आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी बाशिंग बांधून बसलेल्या कार्यकर्त्यांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची वाट पहावी लागणार आहे.

 ■ विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सोसायटीची निवडणूक घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

 

■ मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीला २१ जानेवारी २0१५ पर्यंत मिळालेली मुदतवाढ संपली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर लवकरच प्रशासक येण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनेकांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे कृऊबा समितीची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे.