शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

परभणी : नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेचा अर्ज मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:44 IST

येथील नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जून रोजी नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना आणि भाजप पक्षाने युती करुन निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पांडुरंग नितनवरे यांनी सकाळी ११.३० वाजता आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात युतीचा १, आघाडीचा १ व अपक्ष १ असे ३ उमेदवार राहिल्याने तिरंगी लढत होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): येथील नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जून रोजी नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना आणि भाजप पक्षाने युती करुन निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पांडुरंग नितनवरे यांनी सकाळी ११.३० वाजता आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात युतीचा १, आघाडीचा १ व अपक्ष १ असे ३ उमेदवार राहिल्याने तिरंगी लढत होणार आहे.नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी कॉँग्रेस पक्षाकडून पुजा खरात, भाजपकडून प्रा. एस.एन. पाटील, शिवसेनेकडून पांडूरंग नितनवरे यांच्यासह अपक्ष उमेदवार रतन वडमारे यांनी ६ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १३ जून होती. मात्र प्रमुख पक्षाच्या उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेऊन न्यायालयात अपील दाखल झाल्याने १३ ऐवजी १७ जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार सकाळी ११.३० वाजता शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग नितनवरे यांनी अपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता भाजपाचे प्रा. एस.एन. पाटील, कॉँग्रेसच्या पूजा खरात आणि अपक्ष उमेदवार रतन वडमारे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.दरम्यान, सध्या नगरपालिका आ. मोहन फड आणि डॉ. अंकुश लाड गटाच्या ताब्यात आहे. निवडणुकीच्या सुरुवातीलाच युती करण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र यश न आल्याने आ. मोहन फड आणि डॉ. अंकुश लाड यांच्या गटाने भाजपाच्या तिकीटावर प्रा. एस.एन. पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. तर शिवसेनेकडून पांडुरंग नितनवरे यांनी अर्ज दाखल केला.भाजप आणि सेनेचा स्वतंत्र उमेदवार दिल्याने मतविभाजन होऊन याचा फायदा कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला होऊ नये, यासाठी युती करण्याच्या हलचालीना वेग आला. शेवटी दोन्ही पक्षाने युती करीत ही जागा भाजापाला सोडण्याचा निर्णय घेतला.याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्हास्तरीय नेत्यांना सूचना देत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश ढगे यांनी दिली. यानुसार अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जून रोजी सकाळी ११.३० वाजता शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पांडूरंग नितनवरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांनीही युती झाल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.२३ जून : रोजी होणार मतदान; प्रचारासाठी चार दिवस४मानवत नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी २३ जून रोजी मतदान होणार असून प्रचारासाठी उमेदवारांना केवळ चारच दिवस मिळाले आहेत. प्रचारासाठी वेळ कमी वेळ मिळाला आहे. या वेळेत २६ हजार १५७ मतदारांपर्यंत पोहचायचे असल्याने उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. निवडणुकीसाठी शहारात २१ मतदान केंद्र निश्चित केले आहेत.४२४ जून रोजी तहसील कार्यालयात सकाळी आकरा वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात होणार आहे. या सर्व निवडणुक प्रक्रियेसाठी २७० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उमेश ढाकणे यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूक