सेलू येथील सरोदे नगर भागातील सर्जेराव शेषराव जोगदंड हे ३१ मे रोजी कुटुंबीयांसह घरात झोपले असता रात्री ११.१५ च्या सुमारास त्यांच्या नातवाचा मित्र राहुल विष्णू काळे याने त्यांच्या घरावर दगड फेकण्यास सुरुवात केली. यावेळी सर्जेराव जोगदंड यांनी घराबाहेर येऊन राहुल काळे याला जाब विचारला. त्यावेळी राहुल याने त्यांना शिवीगाळ करीत जवळचा दगड उचलून सर्जेराव जोगदंड यांच्या डोक्यात फेकून मारला. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. जोगदंड यांनी आरडाओरडा केली असता राहुल काळे हा पळून गेला. जखमी सर्जेराव जोगदंड यांना उपचारासाठी सेलू येथील दवाखान्यात व नंतर परभणी येथील दवाखान्यात हलविण्यात आले. उपचारानंतर सर्जेराव जोगदंड यांनी याबाबत ६ जून रोजी सेलू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राहुल काळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दगड डोक्यात मारल्याने एक जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:21 IST