उमरी : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेल्या मुंबई-कल्याण नावाच्या मटका जुगाराने पुन्हा डोके वर काढले असून यावर्षी दुष्काळी स्थितीमुळे बाजारात मंदीची लाट असली तरी या जुगाराच्या धंद्याला मात्र तेजी आल्याचे दिसून येत आहे. आडमार्गावर असले तरी तालुक्याचे व बाजारपेठेचे ठिकाण हेरून मटकाचालकांनी आपला धंदा पद्धती पद्धतशीलरपेण चालू केला. वरिष्ठ अधिकार्यांचे लक्ष जाणार नाही, अशा ठिकाणी मुद्दामच या जुगाराचे नेटवर्क चालू झाले आहे. मटका जुगार हा मुंबई व कल्याण नावाने चालतो. दिवसा कल्याण मटका आकड्यांची नोंद होते, तर सायंकाळनंतर मुंबई बाजार सुरू होतो. उमरीत काही मोक्याच्या ठिकाणी पानटपरी अथवा हॉटेल आदी ठिकाणी बसून एजंट आकड्यांची नोंदणी करतात. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा धंदा कमी झाला होता. आता पुन्हा या जुगाराने डोके वर काढले. श्रमविना पैसा मिळविण्याच्या आशेने बरेच लोक या मटका जुगाराच्या आहारी जात आहेत. याचा फायदा एखाद्या ग्राहकालाच होतो. इतर सर्व मात्र कंगाल होतात. दुसरीकडे जुगार चालकाला मात्र फायदाच फायदा. त्यामुळेच अनेक मटकाचालक अल्पावधीत गब्बर झाल्याचे दिसून येते. जसजसा या जुगाराचा प्रसार होतो आहे तशी सर्व थरातील ग्राहकांची संख्या वाढते आहे. मजूर, कामगार हे बर्याच प्रमाणात या जुगाराच्या आहारी गेले. विशेष म्हणजे विद्यार्थी वर्गातही या मटक्याची माहिती पोचवून त्यांना वार्ममाला लावण्याचे प्रकार होत आहेत. पैशाच्या अमिषाला बळी अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. /(प्रतिनिधी) |
उमरीत मुंबई-कल्याण मटका राजरोस सुरू
By admin | Updated: January 29, 2015 15:06 IST