शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

भौतिक सुविधांचा अभाव

By admin | Updated: December 22, 2014 15:07 IST

विद्यार्थ्यांच्या अध्ययन व अध्यापनावर बाह्य घटकांचा परिणाम करणार्‍या भौतिक सुविधा बहुतांश शाळांमध्ये उपलब्ध नसल्याचे २0१३-१४ च्या यू-डायसवरुन समोर आले आहे.

आकडेवारी सादर करण्यात शाळांची उदासीनता

परभणी : विद्यार्थ्यांच्या अध्ययन व अध्यापनावर बाह्य घटकांचा परिणाम करणार्‍या भौतिक सुविधा बहुतांश शाळांमध्ये उपलब्ध नसल्याचे २0१३-१४ च्या यू-डायसवरुन समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययन व अध्यापनावर बाह्य घटकांचा बुद्धिमत्तेवरही परिणाम पडतो. शाळेच्या परिसराचाही त्यामध्ये समावेश असतो. हे घटकच बहुतांश शाळांमध्ये उपलब्ध नाहीत. शाळा इमारत, मुख्याध्यापकाचे कक्ष, वर्ग खोल्या, शौचालय, पाणी, पाकगृह, संरक्षक भिंत आदी सुविधा जिल्ह्यातील नऊही तालुक्यातील १ हजार १२४शाळांपैकी काही शाळांमध्ये उपलब्ध नाहीत. गंगाखेड तालुक्यात १५८शाळा आहेत. या शाळांपैकी पाच शाळेला इमारत नाही, १0२ शाळांना मुख्याध्यापक नाही, १८ शाळांतील अपंग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प नाहीत तर एका शाळेला शौचालय नाही. ८0 शाळांमध्ये पिण्याचे पाणी नाही. २२शाळांमध्ये पाकगृह नाही. तर १00 शाळांना संरक्षक भिंत नाही. हीच स्थिती विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी ८0 शाळांमध्ये मैदान नाही. जिंतूर तालुक्यातील २१९ शाळांपैकी १६३ शाळांमध्ये मुख्याध्यापक कक्ष नाही. ४५ शाळांमध्ये अपंग विद्यार्थ्यांना रॅम्प नाही. ४0 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शौचालय उपलब्ध नाही तर ५0 शाळांमध्ये पिण्याचे पाणी नाही. २७ शाळांमध्ये किचनशेड नाही. ११७ शाळांना संरक्षक भिंत नाही. तर १00 पेक्षा जास्त शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानच नाही. मानवत तालुक्यातील ७१शाळांपैकी २३शाळांमध्ये मुख्याध्यापकांना बसण्यासाठी कक्ष नाही तर १६ शाळांमध्ये रॅम्प नाही. तर एका शाळेला किचन शेड, २३शाळांना संरक्षक भिंत नाही. २२शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान नाही. पालम तालुक्यातील १0६ शाळांपैकी पाच शाळांना किचनशेड तर ५0पेक्षा जास्त शाळांना संरक्षक भिंत नाही. परभणी तालुक्यातील १५४ शाळांपैकी तीन शाळांना इमारत नसून ९६शाळांना मुख्याध्यापक कक्ष, १६ शाळांना रॅम्प, १0 शाळांमध्ये शौचालय नाही. पिण्याचे पाणी २७ शाळांमध्ये उपलब्ध नाही. २१शाळांमध्ये किचनशेड नाहीत. ९३शाळांना संरक्षक भिंत नाही. तर ९५ शाळांना मैदान उपलब्ध नाही. पाथरी तालुक्यातील १0१ शाळांपैकी ६0शाळांना मुख्याध्यापक कक्ष, २२शाळांमध्ये रॅम्प, ११ शाळांमध्ये पिण्याचे पाणी तर ६0शाळांना संरक्षक भिंत नाही. हीच स्थिती क्रीडांगणाची आहे. पूर्णा तालुक्यातील ११३ शाळांपैकी ६८शाळांत मुख्याध्यापक कक्ष नाही. २0 शाळांमध्ये संरक्षक भिंत नाही. सेलू तालुक्यातील ११३शाळांपैकी ६५ शाळांना संरक्षक भिंत व मैदान नाही. सोनपेठ तालुक्यातील ८९ शाळांपैकी ३९ शाळांना मुख्याध्यापक कक्ष नाही. तर ४0 शाळांमध्ये ६0शाळांना संरक्षण भिंत नाही. एकीकडे ग्रामीण भागातील शैक्षिणक सुविधा पुरविण्यावर शासन भर देत आहे. मोफत व सक्तीचे शिक्षण देत असताना मात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता ज्या बाह्य वातावरणावर अवलंबून आहे. तीच साधने विद्यार्थ्यांना पोहोचलेली नाहीत.

 ■ २0१३-१४ च्या यू-डायसनुसार ही आकडेवारी असली तरी प्रत्यक्षात मात्र यापेक्षा स्थिती वेगळी आहे. काही शाळांची २0१४-१५ ची आकडेवारी अद्याप जमा झाली नाही वा शाळेने जमा करण्याची तसदीही घेतली नाही. भौतिक सुविधांचा एकत्रित आढावा शिक्षण विभागाने सादर करीत असताना प्रत्यक्षात सुविधा नसतानाही उपलब्ध असल्याचे दाखविण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत.