मानवत : नरळद येथे कृषी कार्यालयाकडून केलेल्या कामाची कृषी आयुक्तांच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी केली. या पथकामध्ये पाच कृषी उपयायुक्तांचा समावेश होता. नरळद येथील अंबादास तुपसमुंद्रे व शंकर फड यांनी एकात्मिक पाणलोट कार्यक्रमांतर्गत नरळद, कोल्हा, कोल्हावाडी, ताडबोरगाव, मानवतरोड, रुढी, सावळी, देवलगाव आवचार या आठ गावातील शिवारात ढाळीचे बांध टाकण्याचे काम केले. या कामात यंत्राचा वापर केला वकामे पूर्ण केली नाहीत, अशी तक्रार केली होती. या कामाची कृषी आयुक्तांनी दखल घेत कामाच्या चौकशीसाठी पथक पाठविले. हे पथक कृषी आयुक्त पुणे यांना पाहणी केलेला चौकशीचा अहवाल पाठविणार आहे. त्यानंतर दोषींवर प्रशासकीय कार्यवाही होणार असल्याचे पथकातील कृषी उपसंचालक शिवराज ताठे यांनी सांगितले. पथकातील कर्मचार्यांनी पाहणी केली. /(वार्ताहर)
पथकाकडून पाणलोट क्षेत्राच्या कामाची चौकशी
By admin | Updated: January 27, 2015 12:28 IST