कात्नेश्वर : पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथे २० एकरवर फळबाग लागवड करण्यात आली. मात्र मागील एक वर्षापासून या फळबागांचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पूर्णा तालुक्यात फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढावे, यासाठी राज्य व जिल्हा कृषी कार्यालय प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नाची फलश्रुती म्हणून जवळपास १ हजार हेक्टर क्षेत्रावर जिल्ह्यात फळबाग लागवड करण्यात आली आहे. मात्र पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथे २० एकर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली. या फळबाग लागवडीनंतर शेतकऱ्यांनी अनुदान मिळावे, यासाठी तालुका कृषी कार्यालयाकडे चकरा मारण्यास सुरुवात केली आहे. मात्र केवळ ऑपरेटरअभावी मागील एक वर्षापासून तालुका कृषी कार्यालयाकडून फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान देण्यात आलेले नाही. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.