कोरोनाचा संसर्ग वाढत असून बाधितांच्या विविध अवयवांवर या आजाराचा परिणाम होत आहे. त्यामध्ये शरीरातील रक्त गोठण्याची प्रक्रिया व पर्यायाने कुठल्याही अवयवास पोहोचणारी इजा तसेच डोळे व दंतमुखरोगात म्युकॉरमायकोसिसद्वारे तोंड, वरचा जबडा, सायनसेस व पर्यायाने मेंदू इथपर्यंत संसर्ग होऊ लागला आहे. याचा हळूहळू विविध अवयवांवर परिणाम होत असल्याने कोरोना रुग्णांचा इलाज फक्त फिजिशियनच नव्हे, तर दंत व मुखरोगतज्ज्ञ तसेच नेत्ररोगतज्ज्ञ यांना करावा लागत आहे. विषाणूच्या या बदलामुळे विविध अवयवांच्या आजारांची गुंतागुंत वाढली आहे. त्यामुळे परभणी येथील डॉ. प्रफुल्ल पाटील डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल व डॉ. प्रफुल्ल पाटील मल्टीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि. यांनी रुग्णांची गरज पाहता दंतमुखरोग व नेत्ररोग तपासणी, चिकित्सा ही रुग्णसेवा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना डोळ्याचा, दात किंवा वरच्या जबड्याचा (म्युकॉरमायकोसिस ) त्रास असल्यास त्यांनी येथील तज्ज्ञांचा मोफत सल्ला घ्यावा, असे आवाहन रुग्णालयाच्या संचालिका तथा मनपा सदस्या डॉ. विद्याताई प्रफुल्ल पाटील यांनी केले आहे.
कोविड दंतमुखरोग, नेत्ररोगासाठी मोफत तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:18 IST